Headlines

पुण्यात पोलिसांच्याच गाडीचा थरार:भरधाव पोलिस व्हॅनने 7 वाहनांना उडवले; सीसीटीव्ही व्हिडीओ आला समोर




पुण्याच्या मध्यवर्ती आणि गजबजलेल्या असणाऱ्या सदाशिव पेठ परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. या अपघातात चक्क एका भरधाव पोलिस व्हॅननेच रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तब्बल सात वाहनांना एकापाठोपाठ एक जोरदार धडक दिली. या थरारक घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ आता समोर आला असून, तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेमका अपघात कसा झाला? मिळालेल्या माहितीनुसार, ही पोलिस व्हॅन सदाशिव पेठ परिसरातून भरधाव वेगात जात होती. अचानक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि व्हॅनने रस्त्याकडेला पार्क केलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांना अक्षरशः उडवले. या धडकेचा आवाज इतका भयंकर होता की, परिसरातील नागरिक घाबरून तात्काळ मदतीसाठी रस्त्यावर धावून आले. या भीषण अपघातात गाड्यांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही आणि कोणीही गंभीर जखमी झालेले नाही. अपघाताचे कारण अस्पष्ट विशेष म्हणजे, ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती, मात्र तिचा सीसीटीव्ही व्हिडीओ आता समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. व्हिडीओमध्ये पोलिस व्हॅन अतिशय वेगात येऊन गाड्यांना धडकत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. आता प्रश्न असा निर्माण होतो की, या पोलिस व्हॅनचे ब्रेक फेल झाले होते, की चालकाचा ताबा सुटल्याने हा अनर्थ घडला? याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. हेही वाचा.. राज्यात पावसाची तुफान फटकेबाजी:विदर्भातील 45 तालुक्यांत अतिवृष्टी, पुरात 5 जण वाहून गेले; मुंबईसह कोकणला येलो अलर्ट गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसाने राज्यातील अनेक ठिकाणी रौद्र रूप धारण केले आहे. भारतीय हवामान विभागाने राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली असून, अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दुसरीकडे, विदर्भात पावसाने हाहाकार उडवला असून पुरात वाहून गेल्याने पाच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. पश्चिम विदर्भाला पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. गेल्या ४८ तासांत अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम आणि बुलढाणा या पाच जिल्ह्यांमधील तब्बल ४५ तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. सततच्या पावसामुळे नदी आणि नाल्यांना पूर आला असून, या पुराच्या पाण्यात अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांत ५ जण वाहून गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *