![]()
येथील श्री गणेश महिला बचत गटाच्या वतीने ठाणगाव-आडवरी रोडलगत असलेल्या बेल टेकडीवर २०० वृक्षांची लागवड करण्यात आली. गावचे भूमिपुत्र आयएसआय अधिकारी भरत आंधळे यांनी या उपक्रमासाठी २०० रोपे उपलब्ध करून दिली. लागवड केलेल्या झाडांचे वर्षभर संगोपन करण्याची जबाबदारी महिला बचत गटाने स्वीकारली. पाणी फाउंडेशन फार्मर स्पर्धा योजनेअंतर्गत कृषी विभाग, सिन्नर, उमेद व पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी भरत आंधळे यांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी तसेच भावी पिढीला निरोगी जीवन देण्यासाठी वृक्षारोपणाबरोबरच त्यांचे संगोपन करणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. कार्यक्रमास कृषी विभागाचे ज्ञानेश्वर नाठे, पाणी फाउंडेशनचे अजिंक्य गुरव, कृषी सहाय्यक दीपक गायके, सुनिता कसबे, गोकुळ जाधव यांच्यासह बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.वृक्षलागवडीनंतर झाडांच्या संगोपनासाठी महिला बचत गटाने नियोजन करण्याचा निर्धार व्यक्त केला. या उपक्रमामुळे बेल टेकडी परिसरातील हरित क्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे.
Source link
बेल टेकडीवर 200 वृक्षांची लागवड:श्री गणेश महिला बचत गट स्वीकारणार वर्षभर संगोपनाची जबाबदारी