Headlines

देवगाव रंगारीतील कन्या प्रशालेत विद्यार्थी संसद निवडणूक:विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची जाणीव, निवडणूक प्रक्रियेची माहिती व नेतृत्वगुणांचा विकास व्हावा या उद्देशाने उपक्रम‎



विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची जाणीव निर्माण व्हावी, निवडणूक प्रक्रियेची प्रत्यक्ष माहिती मिळावी आणि नेतृत्वगुणांचा विकास व्हावा या उद्देशाने विनायकराव पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कन्या प्रशाला देवगाव रंगारी येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी

.

शाळेत विद्यार्थी प्रतिनिधींची निवड लोकशाही पद्धतीने करण्यात आली. निवडून आलेल्या १८ प्रतिनिधींची बैठक घेऊन विद्यार्थी संसद स्थापन करण्यात आली. त्यानंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव तसेच विविध विभागांचे मंत्री व सहमंत्री यांची निवड करून त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्यांची माहिती देण्यात आली. यानंतर विविध पदांसाठी निवड करण्यात आली. त्यामध्ये माधवी रामेश्वर गायकवाड हिची अध्यक्षा, समृद्धी नितीन खजिनदार हीची उपाध्यक्षा, प्रगती दिलीप भोपळे हीची सचिव तर साक्षी बाबू ठुबे या विद्यार्थीनीची सहसचिव म्हणून निवड झाली.

तसेच शिक्षण क्रीडा शालेय शिस्त व परिपाठ आरोग्य परिवहन पर्यावरण तसेच शालेय पोषण व पाणीपुरवठा या विभागांसाठीही मंत्री व सहमंत्र्यांची निवड करण्यात आली. सर्व निवडून आलेल्या विद्यार्थिनींना त्यांच्या जबाबदाऱ्या समजावून सांगून शपथ देण्यात आली. ३० जुलै २०२६ रोजी आयोजित विद्यार्थी संसद उद्घाटन समारंभात मुख्याध्यापिका मीराबाई गुंजाळ यांच्या हस्ते सर्व मंत्रीमंडळाचा सत्कार करण्यात आला. यावेळी मार्गदर्शक बाळासाहेब माळी व व्यंकटेश मामड्याल यांनी विद्यार्थिनींना लोकशाही, नेतृत्व, जबाबदारी व संविधानिक मूल्यांचे महत्त्व पटवून दिले.

या उपक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परि श्रम घेतले . या उपक्रमामुळे विद्यार्थिनींना नेतृत्वगुण, जबाबदारीची भावना, शिस्त आणि लोकशाही मूल्यांचे प्रत्यक्ष शिक्षण मिळाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *