![]()
बोल्हेगाव परिसरामध्ये सुरू असलेल्या दारू अड्ड्यांवर छापा टाकत तोफखाना पोलिसांनी कारवाई केली. यात साहस दारू अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. या प्रकरणी महिला पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रमिला गायकवाड यांच्या तक्रारीवरून राम भाऊ खलाटे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, गावठी दारू नष्ट करण्यात आली. महिला हेड कॉन्स्टेबल प्रमिला गायकवाड, पोलिस कर्मचारी दिनेश मोरे आणि हेमंत झिने यांना बोल्हेगाव येथील गांधीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर, बाभळीच्या झाडाच्या आडोशाला एक इसम बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टीच्या दारूची विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने छापा टाकून ही कारवाई केली. या वेळी राम भाऊ खलाटे (वय ४२, रा. मोर्यापार्क, बोल्हेगाव, अहिल्यानगर) याला ताब्यात घेण्यात आले. तेथून दोन ड्रममध्ये भरलेली ५० लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू जप्त करण्यात आली.
Source link
बोल्हेगाव परिसरात पोलिसांचा छापा; सहा दारू अड्डे उद्ध्वस्त