Headlines

ब्रिटनच्या संसदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गौरव:‘लाडकी बहीण’ ‘शासन आपल्या दारी’ योजनेची दखल




उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ब्रिटनच्या संसदेतील हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये ‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन’ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या ऐतिहासिक सभागृहात त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात ‘नमस्कार- जय महाराष्ट्र’ अशी करत मराठीचा गजर केला. हा बहुमान त्यांना नागरिक-केंद्री आणि पारदर्शक प्रशासनासाठी, विशेषतः ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ आणि ‘शासन आपल्या दारी’ या योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी देण्यात आला. शिंदे यांनी हा पुरस्कार महाराष्ट्रातील जनतेच्या कष्टांचा आणि आकांक्षांचा गौरव असल्याचे सांगितले. आपल्या भाषणात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा संदर्भ दिला. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे ‘व्हिजनरी आणि डायनॅमिक लीडर’ असल्याचे सांगत त्यांच्या नेतृत्वाखालील प्रगतीचे कौतुक केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *