![]()
राम कथा आपल्याला शौर्य, वचनबद्धता, भक्ती व बंधुप्रेम शिकवते. त्यामुळे ती कुटुंबासह श्रवण करणे महत्त्वाचे आहे. आपला भाऊ भरत सारखा आपल्याला अपेक्षित असेल तर आपण स्वतः आधी राम आहोत का हे तपासले पाहिजे, असे प्रतिपादन रामकथाकार डॉ. कुमार विश्वास यांनी सोम
.
माजी आमदार स्व. अरुणकाका जगताप यांच्या स्मृतीनिमित्त येथील काका ट्रस्ट व जगताप परिवाराचे वतीने आयोजित ‘अपने अपने राम’ या रामकथा प्रवचनात दुसरे पुष्प डॉ. कुमार विश्वास यांनी गुंफले. यावेळी बोलताना त्यांनी राम कथा सर्वांना माहीत आहे, परंतु ती प्रत्येकाच्या जीवनाशी कशी निगडित आहे हे जाणून घेणे महत्वाचे असल्याचे सांगितले.
दुसऱ्या दिवशीच्या कथेची सुरवातीला बडीसाजन ओसवाल संघाचे अध्यक्ष पेमराज बोथरा, मंदारबुवा रामदासी, डॉ. हर्षवर्धन तमनर, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, धनश्री विखे, नानासाहेब फाटके, अनिल पोखरणा, मोहनलाल मानधना आदींच्या हस्ते श्रीराम, लक्ष्मण, सीता व हनुमान मूर्तींचे पूजन झाले. रामकथेचे विवेचन ऐकण्यासाठी शहरासह जिल्ह्यातून हजारो नागरिकांनी अलोट गर्दी केल्याने एक लाख स्क्वेअर फुटाचा भव्य मंडपही कमी पडला. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सचिन जगताप व आ.संग्राम जगताप यांनी स्वागत केले.
डॉ.विश्वास म्हणाले, श्रीरामांना वनवासात धाडणारी माता कैकयी हिला सर्वांनी दोष दिला असला तरी खरे तर तिचे सर्वांनी आभार मानले पाहिजे. ती खलनायिका नाही. महालातील रामाला तिने सर्व सामान्यांचा राम केल्याने तिचे आभार मानले पाहिजे. तिच्यामुळे जगतकल्याण झाले. रामायणात कोणीही खलनायक नाही. कैकयी, रावण, शूरपणखा ही व्यक्तिमत्त्व त्यांच्या कर्मातून जीवनात काय चांगले व काय वाईट याचे दाखले देतात. रावण हा अनाचार व अहंकाराचे प्रतीक आहे, शूरपणखा वासनेचे प्रतीक तर शबरी वात्सल्य दर्शवते, बिभीषण शरणागताचा उद्धार दर्शवतो, सुग्रीव मैत्रीची कर्तव्याची जाणीव देतो तर हनुमंत भक्तीची ताकद दाखवतो. या सर्वांचे परमेश्वरा प्रति असलेली भक्ती रामायणातून स्पष्ट होते.
डॉ. विश्वास यांनी राम कथेचे अनुषंगाने दिलेले जीवन दाखले टाळ्यांची दाद मिळवून गेले. मुघल आक्रमकांनी रामाचे मंदिर तोडले तरी आमच्या हृदयातील राम तुम्ही तोडू शकत नाही. मृत्यूचे भय दूर करण्याचे काम राम कथा करते. अरुणकाका शरीराने जरी अस्तित्वात नसले तरी त्यांच्या सामाजिक कामाचे यश सर्वांच्या मनात आहे. ्र
प्रारंभी देशात गाजलेल्या गायकांनी सादर केलेल्या भजनांमध्ये उपस्थित भाविक तल्लीन झाले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचा दाखला डॉ. विश्वास यांनी राम-शबरी भेटीच्या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराजांनाही जंगलात राहणाऱ्या गरीब महिलेने युद्धनीतीचा संदेश दिल्याचा दाखला दिला. युद्ध मोहिमेवरून परतताना छत्रपती जंगलात राहणाऱ्या महिलेच्या कुटीत सैनिकांसह राहिले होते. कशा पद्धतीने शत्रूवर आक्रमण केले तर तुमच्या राजाला यश मिळेल याचा सल्ला तिने दिल्यावर ते ऐकून छत्रपतींनी त्यांची युद्धनीती बदलली व गुरिल्ला (गनिमी कावा) अंगीकारून शत्रूला जेरीस आणले व दिल्लीतील उंदराला औरंगजेबला महाराष्ट्रात आणून कुत्ते की मौत दिली, असेही डॉ. कुमार विश्वास यांनी सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला.