![]()
येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या ‘ डीसीपीई’चे माजी प्राचार्य, बृहन महाराष्ट्र योग परिषदेचे सर कार्यवाह डॉ.अरुण खोडसकर याचा छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित राज्य मास्टर्स योगासन स्पर्धेमध्ये महाराष्ट्र योगासना स्पोर्ट असोसिएशन, बृहन महाराष्ट्र योग परिषदचे अध्यक्ष संगमनेरचे डॉ.संजय मालपाणी यांच्या हस्ते फेटा बांधून व योगासन मूर्ती प्रदान करून सत्कार केला . श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाने योगासनाचा प्रचार केला.स्वातंत्र्य प्राप्तीनंतर तर मंडळाच्या योग प्रचार व प्रसार कार्याला वेग आला. गेली ५० वर्षे मंडळातील योगासनाच्या प्रचार व प्रसाराचे कार्य एचव्हीपीएमचे प्रधान सचिव प्रभाकरराव वैद्य यांच्या मार्गदर्शनात प्राचार्य डॉ. अरुण खोडस्कर करीत आहेत. केवळ देशातच नव्हे तर विदेशातही त्यांनी योगासनाचा प्रचार केला असून अनेक विदेशी नागरिकांना योगासनाचे प्रशिक्षण दिले. एचव्हीपीएमच्या पुढाकाराने जम्मू्-काश्मीरात आयोजित आंतरराष्ट्रीय योग संमेलनाचे त्यांच्या मार्गदर्शनात आयोजन केले होते. राष्ट्रीय, राज्ययोगासन स्पर्धा, जिल्हा योगासन स्पर्धा, योगासनावर आधारित आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय चर्चासत्रांत त्यांची मोलाची भूमिका राहिली आहे. त्यांनी योगाच्या प्रसारासाठी स्वत:ला वाहून घेतल्यामुळे त्यांचा सन्मान होत असतो.
Source link
प्राचार्य डॉ. संजय खोडस्करांनी योग क्षेत्रात 50वर्षे केलेल्या कार्याचा गौरव:छत्रपती संभाजीनगर येथे डाॅ.संजय मालपाणी यांच्या हस्ते केला सन्मान