Headlines

‘सायन्सस्‍कोर’वर आता स्वच्छता, स्नानगृह:महापौरांसह नगरसेवकांचा पुढाकार, नागरिकांनी केली होती मागणी‎




अमरावती बाहेरगावाहून शहरात येणारे, शहरवासीयांच्या सोयीसाठी सायन्सकोर मैदानावर अत्याधुनिक स्वच्छता व स्नानगृह उभारणार आहेत. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांच्यासोबत महापौर श्रीचंद तेजवानी यांची सोमवारी २० एप्रिलला यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली. या चर्चेदरम्यान सीईओंनी संबंधित कर्मचाऱ्यांना या प्रकरणी कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. ही जागा जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येत असल्याने, तेथे शौचालय बांधकामासाठी आवश्यक असलेल्या प्रक्रियेसाठी महापौरांनी जिल्हा परिषद प्रशासनाशी पत्रव्यवहार सुरू केला आहे. महापौरांनी कार्यतत्परतेचा प्रत्यय देत मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील सायन्‍सस्‍कोर मैदानावर भेट दिली असता, नागरिकांनी मांडलेल्या समस्यांची दखल घेत त्यांनी तेथे स्वच्छतागृहे आणि स्नानगृहे उभारण्याचे निर्देश मनपा प्रशासनाला दिले आहेत. दररोज सकाळी उर्वरित. पान ४ आता सर्वांना मिळणार चांगल्या सुविधा सायन्सकोर मैदान हे शहरात मोक्याच्या ठिकाणी असून, त्यावर मेळावे, सभा, संमेलनं, प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. कशीतरी वेळ साजरी करण्यास फिरते प्रसाधनगृह ठेवले जाते. परंतु, ते असे काही घाणेरडे केले जाते की, महिलांना त्याचा वापर करता येत नाही. मैदानावर फिरण्यासाठी सकाळी व सायंकाळी महिला, युवती, ज्येष्ठ नागरिक येतात. त्यांच्यासह बाहेर गावाहून येणाऱ्या महिलांनाही सुविधा मिळावी, या उद्देशाने जर येथे कायम स्वच्छता व स्नानगृह झाले तर त्यांना कुचंबणा सहन करावी लागणार नाही. स्वच्छ, सुंदर अमरावतीसाठी महापौरांचे हे महत्‍वाचे पाऊल ठरणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *