Headlines

भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या हॉटेल‎चालक तरुणाचा चाकूने भोसकून खून:केज तालुक्यातील कदमवाडी-टाकळी फाटादरम्यान घडली घटना‎




हॉटेलवर बसलेल्या एकास‎ अनैतिक संबंधातून मारहाण होत ‎‎‎असताना भांडण ‎‎‎सोडविण्यास ‎‎गेलेल्या हॉटेल ‎‎‎चालकास तू‎‎मध्ये पडू नको, ‎‎‎म्हणत चाकूने ‎‎‎भोसकून खून‎‎केल्याची घटना‎कदमवाडी व टाकळी फाटा दरम्यान ‎घडली. विलास नवनाथ घुले (वय‎२५, रा. टाकळी, ता. केज) असे‎खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.‎ टाकळी (ता. केज) येथील मृत‎विलास घुले व आकाश चाळक हे‎भागीदारीमध्ये हॉटेल चालवीत होते.‎२० जून रोजी कदमवाडी फाटा‎येथून जीपमधून बाबासाहेब कदम,‎त्याचा भाऊ मंगेश कदम,‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎बाबासाहेब कदम याचा सासरा‎रामेश्वर गायकवाड हॉटेलमध्ये‎ आले. ते हॉटेलमध्ये बसलेल्या‎उमेश माने यांच्याजवळ आले. ‎बाबासाहेब कदम हा उमेश माने‎यास तुझा मर्डरच करतो, असे‎बोलत उमेश माने यास मारहाण‎करण्यास सुरुवात केली. उमेश माने‎हा केजच्या दिशेने पळाला. त्याला‎वाचवण्यासाठी नितीन घुले व‎विलास घुले त्याच्या पाठीमागे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ पळाले. याचवेळी रामेश्वर‎ गायकवाड (रा. सोनीजवळा) याने‎चाकू विलास घुले याच्या पोटात‎खुपसला‎ . ९ जणांवर केज‎पोलिसात गुन्हा दाखल करण्याची‎प्रक्रिया सुरू होती. भांडण‎सोडविण्यासाठी गेलेल्याचा‎आरोपींनी चाकुने भोसकून खुन‎केला. केज ठाण्यात गुन्हा दाखल‎असून, संतप्त नातेवाइकांनी‎ केजमध्ये रास्ता रोको केला.‎



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *