![]()
शहरात मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांना लक्ष्य करून चाकू यांसारख्या घातक शस्त्रांचा धाक दाखवून मंगळसूत्रे आणि सोनसाखळ्या हिसकावणाऱ्या एका टोळीचा मुख्य सूत्रधार अमोल गलाटेसह ६ जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा म्हणजेच ‘मोक्कां’तर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी या कारवाईला परवानगी दिली आहे. यामध्ये मुख्य सूत्रधार अमोल वैजिनाथ गलाटे, मंगेश वाल्मीक शहाणे, शेख अल्ताफ शेख मुबारक, शेख सिराजुल हक शेख अन्वर अली, अमन महेबूब शेख, आदित्य अनिल काळे यांचा समावेश असल्याची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी दिली. पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात या टोळीविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल आहे. आता या गुन्ह्यात मोक्काचे कलम ३(१)(ii), ३(२), ३(४) समाविष्ट करण्यात आले असून, या प्रकरणाचा पुढील तपास सिडको विभागाचे सहायक पोलिस आयुक्त मनोज पगारे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. ही टोळी दुचाकीवरून चोरी करत होती. काही गुन्ह्यांत त्यांनी चालत्या दुचाकीवरील महिलांचे मंगळसूत्र हिसकावले आहे. अशा प्रकारांमुळे महिलांच्या जिवालाही धोका निर्माण झाला होता.ही टोळी दुचाकीवरून चोरी करत होती. काही गुन्ह्यांत त्यांनी चालत्या दुचाकीवरील महिलांचे मंगळसूत्र हिसकावले आहे. अशा प्रकारांमुळे महिलांच्या जिवालाही धोका निर्माण झाला होता. इनसाइड स्टोरी: आर्थिक फायद्यासाठी बनवली टोळी
पोलिसांनी केलेल्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपींनी केवळ आर्थिक फायद्यासाठी शहरातील महिलांना लक्ष्य करून त्यांच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याच्या उद्देशाने एक संघटित गुन्हेगारी टोळी तयार केली होती. शहरात महिलांच्या सुरक्षेला आव्हान देणाऱ्या या गुन्ह्यांची गंभीर दखल घेत पोलिस आयुक्तांनी थेट ‘मोक्का’चे अस्त्र उगारले आहे.
Source link
संभाजीनगरात सोनसाखळी चोरणाऱ्या 6 जणांच्या टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई:टोळीवर चाकूचा धाक दाखवून महिलांना लुटण्याचे गुन्हे