Headlines

उद्यापासून 2 दिवस विठ्ठलाचे "देऊळ बंद’:आज रात्रीपासून विठ्ठल-रुक्मिणी मूर्तींच्या जतन व संवर्धनाची प्रकिया सुरू




भारतीय पुरातत्त्व विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या सूचनांप्रमाणे आजपासून तीन दिवस श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या मूर्तीवर जतन व संवर्धनाची प्रक्रिया केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवार व बुधवार ( २२, २३ जून ) या दरम्यान श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचे दर्शन बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. मागील आठवड्यात भारतीय पुरातत्त्व विभाग, राज्य पुरातत्त्व विभाग, जिल्हाधिकारी आणि मंदिर समिती यांची एक संयुक्त बैठक पार पडली होती. पुरातत्त्व विभागाने दिलेल्या सूचनेनुसार आणि तज्ज्ञ व्यक्तींच्या सल्ल्याने श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर जतन व संवर्धन प्रक्रिया राबवली जाणार आहे. मंदिर आणि मूर्ती पूर्णपणे सुरक्षित राहतील यासाठी मंदिर समिती कटिबद्ध आहे. त्यामुळेच ही प्रक्रिया केली जात असल्याचे शेळके यांनी सांगितले. स्थानिक महाराज मंडळी आणि विविध संघटनांना या प्रक्रियेची माहिती आधीच देण्यात आली आहे. दर्शनविषयक महत्त्वाचे
२२ जून (सोमवार) नेहमीप्रमाणे दिवसभर दर्शन सुरू राहील. मात्र, रात्री १० वाजता दर्शन बंद करण्यात येईल आणि त्यानंतर मूर्तींवरील संवर्धनाची प्रक्रिया सुरू होईल. मंगळवार व बुधवार या दोन दिवशी विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचे दर्शन पूर्णपणे बंद राहणार आहे. सर्व प्रक्रिया तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार असून गुरुवारपासून नित्यनियमानुसार दर्शन सुरू राहील.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *