![]()
डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या सामाजिक कार्याचा आणि त्याद्वारे झालेल्या वर्तमानातील प्रगतीचा आढावा घेतल्यास भाऊसाहेबांचे विचार हे सदैव प्रेरणादायी आणि जीवनाला दिशा देणारे आहेत. समाज सुधारण्याची त्यांची तळमळ आजही अंतर्मुख करणारी आहे. असे मत प्रा. डॉ. प्रकाश तायडे यांनी येथे व्यक्त केले. येथील जे. डी. पाटील सांगळूदकर महाविद्यालयात डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे जीवनावर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून प्रा. तायडे बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अण्णासाहेब रेचे होते, तर प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा. प्रभाकर कोलखेडे, शिवाजी देशमुख, नरेंद्र लढ्ढा, प्रदीप देशमुख, शेषराव काळे, आजीवन सदस्य दिनकर गायगोले, श्रीरंग पाटील अरबट, प्रा. पंजाब म्हाला, प्राचार्य डॉ. अतुल बोडखे मंचावर उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणातून अण्णासाहेब रेचे यांनी भाऊसाहेबांचे जीवन हे त्यागाचे प्रतिक असून त्यांच्या विचारामुळेच समाजशील, साक्षर नागरिक घडण्यास मदत झाली असे मत व्यक्त केले. कार्यक्रमादरम्यान प्रमुख वक्ते प्राध्यापक डॉ. प्रकाश तायडे व स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या स्थानिक विद्यार्थ्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला. स्थानिक विद्यार्थ्यांनी केलेली प्रगती आणि त्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट फार मोलाचे असल्यामुळे टाळ्यांच्या कडकडात त्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. अतुल बोडखे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.डॉ.विनोद कोकणे यांनी केले तर आभार प्रा.डॉ. संजय आगलावे यांनी मानले. गौरव गीत प्रा.विनोद वानखडे व विद्यार्थी यांनी सादर केले. याप्रसंगी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. खासदार वानखडे यांच्या उपस्थितीत अभिवादन डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुण्यतिथी निमित्त भाऊसाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला खासदार बळवंतराव वानखडे यांच्या हस्ते हारार्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शाळा विकास समितीचे सदस्य, तथा प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Source link
भाऊसाहेबांच्या कार्यामुळे माणसाला माणूसपण प्राप्त झाले- प्रा. डॉ. तायडे:जे. डी. पाटील सांगळूदकर महाविद्यालयात आयोजित व्याख्यानास प्रतिसाद