Headlines

भारत- अमेरिका कराराविरोधात शेतकरी:मजुरांसह कामगारांचे शहरामध्ये आंदोलन




महाराष्ट्र राज्य किसान सभा, महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियन आणि कामगार संघटनांचा महासंघ असलेल्या आयटकच्या संयुक्त सहभागाने जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. भारताने अमेरिकेसोबत केलेली ‘ट्रेड डील’ कृषी व व्यापारविषयक करार हा व्यापारी, शेतकऱ्यांच्यादृष्टीने घातक असल्यामुळे तो रद्द केला जावा, अशी मागणी या वेळी केली. आंदोलनाच्या शेवटी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत प्रधानमंत्री व राष्ट्रपती महोदयांना निवेदन पाठविण्यात आले. प्रा. साहेबराव विधळे, प्रा. विजय रोडगे, किसान सभेचे प्रदेश सरचिटणीस अशोक सोनारकर, भाकपचे जिल्हा सचिव सुनील मेटकर, शेतमजूर युनियनचे राज्य सचिव संजय मंडवधरे यांनी यावेळी मांडणी केली. .प्रारंभी शाहीरी जलसाचे धम्मा खडसे यांचा क्रांतिकारी गीताचा कार्यक्रम झाला. आंदोलनात किसान सभेचे जिल्हा सचिव डॉ. ओमप्रकाश कुटेमाटे, शेतमजूर युनियनचे जिल्हा कार्याध्यक्ष सुनील घटाळे, विनोदराव जोशी, जे एम कोठारी, निळकंठ ढोके, शरदराव मंगळे, लताताई सोनारकर, उमेश बनसोड, जयेंद्र भोगे, प्रतिभाताई मेश्राम, मनोहर वाढनकर, चंद्रकांत बानूबाकोडे, त्र्यंबक संभावित, चंद्रकांत वडसकर, अशोकराव काळे, राजाभाऊ बाभुळकर, जितेंद्र कोरडे, विनोद तऱ्हेकर, विजया गावंडे, माधुरी काकडे, अर्चना गोंधळी, किसनराव चौधरी, विजय चव्हाण, धनंजय मस्के, अ. हाजी अ. हमीद, मनोज अडकणे, संदीप उके, नंदू नेतनराव, अशोकराव राऊत यांचे सह ग्रामीण भागातील विविध तालुक्यातील कार्यकर्ते सहभागी झाले होते. देशातील शेतीवर काम करणाऱ्या शेतमजुराला बारमाही काम मिळण्याकरिता मोठ्या जनआंदोलनातून मनरेगा कायदा पुढे आला .तो संपवून त्याचे जागी ‘जी रामजी’ योजना पुढे आणली. यात महात्मा गांधींचा द्वेष व शेतमजुराला ३६५ दिवसाचा रोजगार नाकारणे अशा प्रमुख बाबी आहेत. म्हणून मनरेगा पूर्वस्थितीमध्ये कायम करा, असेही या आंदोलनाद्वारे ठासून सांगण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *