![]()
येथील गोदावरी नदीत अधिक मासानिमित्त पवित्र स्नानासाठी दररोज ५ ते सहा हजार भाविक येतात. मात्र, नदीपात्रात ८ नाल्यांचे दुर्गंधीयुक्त पाणी सोडण्यात येत असल्याने भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अधिक मासात गोदावरी स्नानाला विशेष धार्मिक महत्त्व असल्याने दररोज पाच हजार भाविक संत एकनाथ महाराज मंदिराच्या पाठीमागे, नागघाट आणि इतर घाटांवर स्नानासाठी येत आहेत. मात्र शहराच्या हद्दीबाहेरील नदीपात्रातील प्रदूषण थेट जायकवाडीच्या पाण्यात मिसळत असल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. नदीतील वाढत्या प्रदूषणामुळे मासेमारी व्यवसायावरही परिणाम होत असून, प्रदूषण नियंत्रणासाठी संबंधित यंत्रणांनी नियमित पाणी तपासणी करून दोषी उद्योगांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. नगराध्यक्ष विद्या कावसानकर म्हणाल्या, अधिक मासासाठी गोदावरी स्नानाला मोठी गर्दी असते. त्यामुळे विशेष उपाययोजना करून नदीपात्रात केमिकल दूषित पाणी जाणार नाही, यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येतील. त्याबाबत पालिका प्रशासनाला सूचना करण्यात येणार असून, लवकरच यामध्ये बदल झालेला दिसून येईल. हजारो भाविक गोदावरीत स्नानासाठी येत आहेत. अशा वेळी नदीत केमिकलयुक्त पाणी सोडणे गंभीर आहे. संबंधित उद्योगांवर कठोर निर्बंध घालून नदी प्रदूषण तातडीने थांबवावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जितु परदेशी यांनी केली. तर गोदावरीचे पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी दूषित पाणी नदीत सोडणे थांबवावे, असे डॉ. पंडित किल्लारीकर यांनी सांगितले. गोदावरीत दूषित पाणी मिसळत असल्याच्या तक्रारी वारंवार होत असतानाही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्रभावी कारवाई होत नसल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. अधिक मासात लाखो भाविक नदीकाठी येत असल्याने नदीच्या पाण्याच्या गुणवत्तेची तातडीने तपासणी करण्याची मागणी होत आहे. प्रदूषण मंडळही लक्ष देईना प्रदूषण रोखण्यासाठी पुढाकार घेणार : Ãगोदावरी ही पैठणच्या धार्मिक आणि सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक मानली जाते. अधिक मासाच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविकांच्या श्रद्धेशी निगडित असलेल्या या नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासन, उद्योग आणि नागरिकांकडून संयुक्तपणे पुढाकार घेतला जाईल. – पल्लवी अंभोरे, मुख्याधिकारी.
Source link
भाविकांची गैरसोय:पैठण शहरामधील 8 नाल्यांचे पाणी गोदावरीच्या नदीपात्रात, विविध जिल्ह्यांतून दररोज 6 हजार भाविक येतात स्नानासाठी,