![]()
सावेडी उपनगर परिसरातील प्रोफेसर चौक परिसरात बुधवारी महावितरण कंपनीच्या भूमिगत केबलमध्ये बिघाड झाल्याने प्रोफेसर चौक फिडरवर अवलंबून असलेल्या अनेक वसाहतींमधील वीज पुरवठा तब्बल १४ तासांपेक्षा अधिक काळ बंद होता. विजेअभावी नागरिक विशेषतः गृहिणींच्या दैनंद
.
गेल्या दोन दिवसांपासून शहरात सतत पाऊस सुरू आहे. बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास पाऊस पडत असताना सावेडी उपनगरातील वीजपुरवठा खंडित झाला. पाऊस थांबल्यानंतर महावितरणकडून दुरुस्तीचे काम सुरू झाले. मात्र, सुमारे चार तासानंतर भूमिगत वायरिंगमध्ये बिघाड असल्याचे समोर आले. काल दिवसभर महावितरणचे अधिकारी व कर्मचारी दुरुस्तीसाठी तळ ठोकून होते. खासगी कर्मचाऱ्यांचीही मदत घेण्यात आली. मात्र, सायंकाळी ८ वाजेपर्यंत वीजपुरवठा सुरळीत झालेला नव्हता. तब्बल १५ तास वीजपुरवठा बंद असल्याने गृहिणींची कामे खोळंबली. विजेअभावी मोटार उर्वरित पान ४
डक्ट न करता केबल टाकल्याने अडचणी टीव्ही सेंटर ते भिस्तबाग चौक रस्त्याचे काम होत असतानाच सुमारे दोन कोटी रुपये खर्चून या रस्त्यावर भूमिगत केबल टाकण्यात आल्या. मात्र, केबल टाकताना कोणताही स्वतंत्र डक्ट न करता केवळ रस्ता खोदून मिळेल त्या जागेत केबल टाकण्यात आल्या. त्या ठिकाणी केबल असल्याची कोणतीही सूचना नसल्याने इतर कामांच्या खोदकामावेळी या वाहिन्यांचे नुकसान होते. यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. तसेच, डक्ट नसल्याने या केबल्समध्ये झालेला बिघाड शोधण्यातही अनेक अडथळे येत आहेत. परिणामी, दुरुस्तीसाठी विलंब होत आहे.
वीज नसल्याने पूर्ण दिवसभर काम बंद ^ बुधवारी पहाटेच वीजपुरवठा खंडित झाल्याने घरात अडचणी आल्या. मात्र, व्यवसायावरही परिणाम झाला. माझा टेलरिंग व्यवसाय असून बहुतांशी मशिन विजेवरच आहेत. वीज पुरवठा खंडित असल्याने व सायंकाळपर्यंत वीज न आल्याने आज दिवसभर काम बंद ठेवावे लागले. किरकोळ पावसातही वीज खंडित होत असल्याने मोठे नुकसान होत आहे. महावितरणने यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे. – महेंद्र दिवाणे, व्यावसायिक