Headlines

भोंदू खरातचा अंक खेळ उघड:कार नंबरपासून साम्राज्यापर्यंत 9 चा प्रभाव; अंकशास्त्राच्या नावाखाली फसवणूक, पण शेवटी गणित बिघडलं




भोंदूगिरी आणि अंकशास्त्राच्या नावाखाली लोकांना फसवणाऱ्या अशोक खरातच्या कारनाम्यांमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. अंकशास्त्राचा मोठा गाजावाजा करणारा खरात स्वतःसाठी 9 हा अंक अत्यंत शुभ मानत होता. त्यामुळेच त्याने आपल्या गाड्यांचे नंबरही खास करून असे निवडले, ज्यांची बेरीज 9 येईल. तपासादरम्यान ही बाब समोर आल्यानंतर त्याच्या अंधश्रद्धेच्या खेळाचा आणखी एक पैलू उघड झाला आहे. तपास यंत्रणांच्या चौकशीत असे समोर आले की, खरातने आरटीओमधून चॉइस नंबर घेऊन आपल्या गाड्यांचे क्रमांक निश्चित केले होते. या सर्व नंबरांची बेरीज 9 येईल याची तो विशेष काळजी घेत असे. अंकशास्त्राच्या माध्यमातून लोकांचा विश्वास संपादन करून त्याने अनेकांना जाळ्यात ओढले. मोठमोठ्या नेत्यांपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत अनेकांना त्याने आपल्या प्रभावाखाली घेतल्याचे आरोप आहेत. दरम्यान, खरातविरोधात अनेक गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. महिलांचे लैंगिक शोषण, फसवणूक आणि अंधश्रद्धा पसरवण्याचे आरोप त्याच्यावर आहेत. एसआयटीच्या तपासानंतर आणि हेल्पलाईन सुरू झाल्यानंतर अनेक महिलांनी व व्यावसायिकांनी त्याच्याविरोधात तक्रारी नोंदवल्या आहेत. त्यामुळे त्याच्या गैरकृत्यांची व्याप्ती किती मोठी होती, याची कल्पना येत आहे. अंकशास्त्रानुसार 9 हा अंक बंधुत्व, समृद्धी, भाग्य आणि मानवतावादी कार्याशी जोडलेला मानला जातो. तसेच मंगळ ग्रहाशी संबंधित असल्याने हा अंक ऊर्जा आणि यशाचे प्रतीक असल्याचे मानले जाते. याच कारणामुळे खरातने 9 या अंकाला विशेष महत्त्व दिले होते. पैसा आणि यश मिळवण्यासाठी हा अंक उपयोगी ठरतो, असा त्याचा विश्वास होता. खरातच्या ताब्यातील इतर वाहनांवरही 9 अंकाचा प्रभाव दिसून आला आहे. उदाहरणार्थ, त्याच्या एका गाडीचा नंबर 6453 असून, त्याची बेरीज 18 होते आणि पुढे 1+8 केल्यास ती 9 येते. यावरून त्याने प्रत्येक गोष्टीत अंकशास्त्राचा वापर करून स्वतःची प्रतिमा निर्माण केली होती. तपास यंत्रणांनी त्याच्या मालमत्तांची तपासणी केल्यानंतर त्याच्या ऐषारामी जीवनशैलीचे अनेक पुरावे समोर आले आहेत. अंकाच्या खेळामुळे आता अडचणीत दरम्यान, अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) खरातच्या संपत्तीची चौकशी सुरू असून त्याने कमावलेला पैसा नेमका कुठून आला आणि कुठे वापरला गेला, याचा शोध घेतला जात आहे. बांधकाम व्यावसायिकांसह अनेक मोठ्या व्यक्ती त्याच्या जाळ्यात अडकल्या असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकीकडे 9 या अंकावर विश्वास ठेवून साम्राज्य उभं करणारा खरात, त्याच अंकाच्या खेळामुळे आता अडचणीत सापडल्याचे चित्र दिसत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *