Headlines

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य:पुणे पोलिसांकडून दोघांवर गुन्हा दाखल




राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविषयी समाज माध्यमांवर अवमानकारक चित्रफीत प्रसारित केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डेक्कन पोलिसांनी या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. याबाबत भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक सुनील पांडे (वय 56, रा. भांडारकर रस्ता, डेक्कन जिमखाना) यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संतोष पंडित याच्यासह अन्य एका व्यक्तीविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी ‘राजकारण एक्सप्रेस’ या समाज माध्यमातील खात्यावर ही चित्रफीत प्रसारित केली होती. यामध्ये “जनतेच्या प्रश्नांची उत्तरे नेते देत नाहीत. पाटील हे त्यापैकी एक आहेत,” असा मजकूर होता.या चित्रफितीत अश्लील आणि शिवराळ भाषेचा वापर करत अवमानकारक वक्तव्ये केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. नगरसेवक पांडे यांनी ही चित्रफीत निदर्शनास आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार केली होती. भारतीय न्याय संहिता कलम 356, 296, 3 (5) अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक एस. जाधव या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. जेसीबीने संरक्षक कुंपण तोडून जमिनीचा ताबा घेण्याचा प्रयत्न जेसीबीच्या मदतीने खासगी मालकीच्या जमिनीत अनधिकृत प्रवेश करून तारांचे कुंपण आणि लोखंडी बोर्ड तोडण्यात आला. या प्रकारात सुमारे 30 हजार रुपयांचे नुकसान करून जागेचा ताबा घेण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार वाडेबोल्हाई परिसरात घडला. याप्रकरणी बळीराम तुकाराम गावडे (रा. वाडेबोल्हाई, ता. हवेली, जि. पुणे) याच्यावर लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विजय विठ्ठल जाधव (वय 59, रा. विमाननगर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 25 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता वाडेबोल्हाई येथील गट क्रमांक 615, हिस्सा क्रमांक दोनमध्ये हा प्रकार घडला. फिर्यादीच्या मालकीच्या एकूण वीस आर क्षेत्रात आरोपीने जेसीबीच्या साह्याने अनधिकृत प्रवेश केला. जेसीबीने जमिनीभोवती असलेले तारांचे कंपाऊंड आणि लोखंडी बोर्ड तोडून सुमारे 30 हजार रुपयांचे नुकसान केले. त्यानंतर जागेचा अनधिकृत ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. फिर्यादीने जाब विचारल्यानंतर त्यांना दमदाटी करीत पुन्हा प्लॉटवर कसे येता, ते पाहतो, अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *