पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात ओबीसी समाजावर प्रचंड मोठा अन्याय होत आहे. 2016 मधील यूपीएससी परीक्षेत मेरिटवर उत्तीर्ण झालेल्या तब्बल 314 ओबीसी विद्यार्थ्यांना नॉन-क्रिमीलेअरच्या अटीचे कारण दाखवून आयएएस आणि आयपीएस होण्यापासून रोखण्यात आले,
.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, 2016 मध्ये युपीएससीची परीक्षा झाली आणि जवळपास 314 विद्यार्थ्यी ओबीसीमधून पास झाले त्यांना तुम्ही क्रिमिनेअरच्या अटीमध्ये बसत नाही मर्यादेच्या आतमध्ये तुम्ही नाही म्हणत त्यांनी आयएएस आणि आयपीएस होण्यापासून वगळण्यात आले, त्यांना जॉईन होऊ दिले नाही. ही सर्व मुले मिरीटवर सिलेक्ट होऊ शकली असती पण तसे करण्यात आले नाही. ओपनच्या कमी मार्क असलेल्या मुलांना युपीएससीच्या परीक्षेत पास करण्यात आले आणि त्यांना प्रशासकीय पदांवर रुजू करण्यात आले. हे सरकार मनुवादी विचारांचे सरकार आहे त्यांना बहुजन आणि ओबीसींचे काही देणंघेणं नाही.

भागवतांना भारतात बोलण्याची संधी नाही
विजय वडेट्टीवार म्हणाले की, मोहन भागवत यांना देशात बोलण्याची संधी नाही ते न्युयार्कमध्ये जाऊन बोलतात. आमच्या पक्षाचे अध्यक्ष एक कार्यक्रम घेतात तिथे जात शुद्धीकरण करण्यात येते त्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला पाहिजे. राहुल गांधी यांनी यावर आवाज उठवला तर त्यांच्यावर टीका करतात त्यांच्यावर गुन्हा दाखल करतात हे चुकीचे आहे. राहुल गांधी यांचा आवाज तुम्ही असे गुन्हे दाखल करत दाबू शकत नाही. काँग्रेस सरकार असताना हिंदूंना कधी भीती वाटली नाही. पण आता वाटत आहे हे बोगस लोकं आहेत. हिंदू म्हणणाऱ्या लोकांनी जिन्नासोबत निवडणूक का लढवली. सर्व धर्मांच्या लोकांना आपल्या धर्मांसाठी काम करता आले पाहिजे. धार्मिक तेढ निर्माण करणे हा गुन्हा असावा अशी भूमिका घेतली पाहिजे. देशाची परिस्थिती गेल्या 12 वर्षांमध्ये अतिशय खराब झाली आहे. केवळ विश्वगुरू म्हणून काही होत नसते, केवळ बोलून काही होत नसते त्यासाठी काम करावे लागते.
भागवत जे न्युयार्कमध्ये बोलले ते इथे बोलावे
विजय वडेट्टीवार म्हणाले की, मोहन भागवत यांनी अमेरिकेत जे वक्तव्य केले तसे इथे वागले पाहिजे. महाराष्ट्रातील मंत्री सांगतात की हा आमचा देश आहे, इतर धर्माीय इथे राहु शकत नाही. सहिष्णू म्हणत साताऱ्यात मशिदीमध्ये घुसत एका इंजिनिअरचा खून करण्यात आला. भागवत यांनी देशात विचार पेरताना चांगले विचार मांडावे बाहेर देशात वेगळे आणि आपल्या देशात एक असे असून नये.
ही लोकशाहीची गळचेपी
विजय वडेट्टीवार म्हणाले की, विद्यार्थ्यी हक्कासाठी लढतो त्यावेळी आपण त्यांच्यावर लाठीचार्ज करायचा त्यांना जखमी करायचे आणि त्यांच्यावर केसेस करायच्या, लोकशाहीमध्ये हक्क मागणे कोणता गुन्हा आहे, लोकशाहीची गळचेपी आहे. विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेणं ही त्यांची रास्त मागणी आहे. हे ही वृत्त वाचा गेल्या 10 वर्षांत मोदी, शहा अन् फडणवीसांनी समाजात आगी लावल्या:भाजपने जातीय राजकारण तात्काळ बंद करावे- संजय राऊत

भाजप आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जातीय राजकारण करणे बंद केले पाहिजे. यापूर्वी अनेक मोठे मोठे नेते झाले त्यावेळी असे प्रश्न का निर्माण झाले नाही. गेल्या 10 वर्षांमध्ये समाजामध्ये आगी लावण्याचे काम देवेंद्र फडणवीस, अमित शहा, नरेंद्र मोदी यांनी केले आहे, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे, यांना केवळ श्रेय घ्यायचे आहे. राज्यातील प्रमुख प्रश्नांवर प्रमुख नेत्यांना बोलावून चर्चा करावी असे मुख्यमंत्र्यांना का वाटत नाही. लहान पक्षांना सोडा पण मुख्य पक्षांना बोलावत राज्यातील गंभीर विषयावर चर्चा करत नाही तो पर्यंत मी त्यांना महाराष्ट्राचा नेता म्हणणार नाही. वाचा सविस्तर