Headlines

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात:छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या भरधाव ट्रॅव्हल्स बसची कंटेनरला धडक; एकाचा मृत्यू तर 10 प्रवासी गंभीर




समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरजवळ ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात झाला. संभाजीनगरच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रॅव्हल्सने पुढे चाललेल्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात वैजापूर येथील हेमंत दाभाडे (वय ६५) यांचा जागीच मृत्यू झाला. तर बसमधील १० प्रवासी गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अतिवेगामुळे घडला अनर्थ! मिळालेल्या माहितीनुसार, प्रवाशांनी भरलेली ही ट्रॅव्हल्स बस छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने अतिवेगात जात होती. वैजापूरजवळ आल्यानंतर चालकाचे बसवरील नियंत्रण अचानक सुटले आणि बस थेट पुढे जाणाऱ्या एका कंटेनरवर जाऊन आदळली. ही धडक इतकी भयंकर होती की ट्रॅव्हल्सच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघातानंतर प्रवाशांच्या आक्रोशाने महामार्गावर काही काळ गोंधळाचे आणि घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि महामार्ग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. या दुर्घटनेत हेमंत दाभाडे (वय ६५, रा. वैजापूर) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. बसमध्ये अडकलेल्या इतर जखमी प्रवाशांना बाहेर काढून तातडीने वैजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे. सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर हा अपघात चालकाच्या अतिवेगामुळे झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज असून वैजापूर पोलीस अधिक तपास करत आहेत. एकीकडे समृद्धी महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन केल्याने सातत्याने जीवघेणे अपघात होत आहेत, तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांत महामार्गावर धावत्या वाहनांमधून चोरी होण्याच्या चार मोठ्या घटनांचे व्हिडिओ समोर आले आहेत. हेही वाचा.. दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट:समृद्धी महामार्ग सुरक्षेची पडताळणी; 5 तासांच्या प्रवासात पोलिसांना 4 वेळा कॉल, तरी कुणी येईना समृद्धी महामार्गावर दोन दिवसांपूर्वी दरोड्याची घटना घडली. दरोडेखोरांनी हैदोस घालत प्रवाशांना लुटले. अमानुष मारहाण केली. हा राज्यातील सर्वात मोठा महामार्ग, सरकारचा अत्यंत महत्त्वाकांक्षी ड्रीम प्रोजेक्ट… मात्र घडलेल्या दरोडेच्या घटनेनंतर दिव्य मराठी टीमने रविवारी (30 ऑगस्ट) प्रत्यक्ष महामार्गावर उतरत पडताळणी केली असता सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे दिसले. विशेष म्हणजे मदतीसाठी पोलिसांना 4 वेळा कॉल केले तरी कुणी मदतीसाठी आले नाही हे विशेष. ‘दिव्य मराठी’च्या टीमने सावंगी इंटरचेंज ते वैजापूर इंटरचेंजदरम्यान सायंकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत 5 तास ‘लेट-नाइट’ रिॲलिटी चेक केला. यावेळी समृद्धीच्या सुरक्षेचा बोजवारा उडाल्याचे दिसले. सविस्तर वाचा हिंगोली-औंढा मार्गावर भीषण अपघात: बंदोबस्तावरून परतणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू; पोलिस दलावर शोककळा हिंगोली ते औंढा नागनाथ मार्गावर हिवरा शिवारात दुचाकी व ट्रक अपघातात पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी ता. 30 मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. मुरलीधर जाधव (50) असे मयत कर्मचाऱ्याचे नांव असून बंदोबस्त आटोपून ते बासंबा कडे निघाले असतांना हा अपघात झाल्याचे सुत्रांनी सांगितले. या घटनेमुळे पोलिस दलावर शोककळा पसरली आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *