Headlines

मनमाडला गुणवंतांमध्ये मुलींनी राखले वर्चस्व:केंद्राचा निकाल 90 तर शहरातील सहा विद्यालयांचा निकाल 100 टक्के; पूजा कुशवाह केंद्रात प्रथम‎



महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि. ८) ऑनलाईन जाहीर झाला असून मनमाड केंद्राचा एकूण निकाल ९० टक्के लागला आहे. यंदाच्या निकालात मुलींनी उल्लेखनीय यश मिळवत गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये बाजी मारली

.

सेंट झेवियर्स हायस्कूलमधील पूजा मुकुंद कुशवाह हिने ९६.२० टक्के गुण मिळवत केंद्रात अव्वल स्थान पटकावले. के. आर. टी. शाळेतील तनुश्री चंद्रकांत नाईक हिने ९५.६० टक्के गुण मिळवत विद्यालयात प्रथम क्रमांक मिळवला, तर छत्रे हायस्कूलमधील तनूज दत्तू जाधव याने ९५.४० टक्के गुण मिळवले.

शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळांमध्ये सेंट झेवियर्स हायस्कूल, मरेमा इंग्रजी माध्यम विद्यालय, वागदर्डी विद्यालय, श्री गुरुगोविंद सिंग हायस्कूल, बी. जी. दरगुडे विद्यालय आणि इकरा हायस्कूलचा समावेश आहे. वागदर्डी विद्यालयातील कावेरी नरहरी पगार हिने ९३ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला. श्री गुरुगोविंद सिंग हायस्कूलमधील प्लाविनी राजेंद्र राठोड हिने ९१.४० टक्के गुण मिळवत अव्वल स्थान पटकावले. एच. ए. के. उर्दू शाळेतील सय्यद अरीबा फातिमा वाजिद हिने ८३.६० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला, तर मराठी माध्यमातून शाह आयेशा शाहिद हिने ७२.२० टक्के गुण मिळवले. शहजादी इंग्लिश मीडियम स्कूलमधील शेख मसिरा शाकीर हिने ९१ टक्के, संत बार्णबा शाळेतील अंकित विनोद अडांगळे याने ८६.२० टक्के, बी. जी. दरगुडे विद्यालयातील तृप्ती गौतम केदारे हिने ८० टक्के, इकरा शाळेतील शेख ईकरा सगीर हिने ८५.४० टक्के, तर व्ही. एन. नाईक हायस्कूलमधील साहिल संदीप शिंदे याने ७९.८० टक्के गुण मिळवत विद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळवला. दरम्यान, के. आर. टी. शाळेचा निकाल ९९.११ टक्के, छत्रे हायस्कूलचा ९९.२३ टक्के, एच. ए. के. हायस्कूलचा ७६ टक्के, शहजादी इंग्लिश मीडियम स्कूलचा ९६ टक्के, संत बार्णबा शाळेचा ८९ टक्के, तर व्ही. एन. नाईक हायस्कूलचा निकाल ७५.८१ टक्के लागला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *