Headlines

मनमाडला पंधरा दिवसांपासून अपघातात तुटून पडलेल्या विद्युत खांबाला श्रद्धांजली:वंचित बहुजन आघाडीने प्रशासनाचे वेधले लक्ष




इंदूर-पुणे महामार्गावरील येथील उड्डाणपुलावर अपघातात तुटून पडलेला विद्युत खांब तब्बल पंधरा दिवसांपासून रस्त्यावरच पडून असल्याने वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. महावितरण आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे पडलेल्या या खांबाला पुष्पहार घालून व फुले वाहून नागरिकांनी श्रद्धांजली अर्पण करत प्रशासनाचे लक्ष वेधले. पंधरा दिवसांपूर्वी एका भरधाव वाहनाने उड्डाणपुलावरील विद्युत खांबाला जोरदार धडक दिली होती. यानंतर उर्वरित पान २ महावितरण आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ४८ तासांत हा धोकादायक खांब हटवून रस्ता मोकळा करावा, अन्यथा वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते हा खांब भंगारात विकतील व त्यातून मिळालेले पैसे महावितरणला भीक म्हणून देतील, असा इशारा शहराध्यक्ष विलास आहिरे यांनी दिला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *