Headlines

मनोज जरांगे पाटील यांचे 3 वर्षांतील 11 वे उपोषण आजपासून:जालन्यातील 1700 पोलिसांच्या सुट्या रद्द, अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या व्याज परताव्याची नवी मागणी




मनोज जरांगे पाटील २९ ऑगस्टपासून आंतरवाली सराटीत आमरण उपोषणास बसत आहेत. ३ वर्षांतील त्यांचे हे ११ वे आंदोलन आहे. जालन्यातील सर्व १७०० पोलिसांच्या सुट्या २९ ऑगस्ट ते ५ सप्टेंबरदरम्यान रद्द केल्या आहेत. आरक्षणासोबत विद्यार्थ्यांना सवलती, अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या व्याज परताव्याची नवी मागणी आहे. आंतरवालीत ४०० पोलिस तैनात, ४ राहुट्या आंतरवालीत ४०० पोलिस, ४ डीवायएसपी, ११ पीआय, आरसीपी ३ प्लाटून, १ एसआरपीएफ कंपनी तैनात आहे. आंतरवाली आणि वडीगोद्री परिसरात ४ ठिकाणी राहुट्या आहेत. वडीगोद्री-आंतरवाली रस्त्यावर, वडीगोद्रीकडील डाव्या कालव्याजवळ, बीड- जालन्याचा रस्ता एकत्र येतो तेथे, तर आंदोलनस्थळाजवळ अशा ४ ठिकाणी पोलिस राहुट्या आहेत. जरांगेंची रणनीती : एकावेळी न येता टप्प्याटप्प्याने बोलावले यापूर्वी जरांगे यांनी समाजबांधवांना २९ ऑगस्टलाच आंतरवालीत बोलावले होते. आता मात्र त्यांनी टप्प्याटप्प्याने येण्याचे आवाहन केले आहे. शिवाय मुंबईकडे निघण्याचाही पर्याय हाताशी ठेवला आहे. त्यांनी मुंबई पोलिसांकडे आझाद मैदानावर उपोषणासाठी अर्ज केला होता. सरकारला आंतरवाली सराटीतून जाहीर अल्टिमेटम देऊन जरांगे पाटील मुंबईकडे कूच करू शकतात. सरकारची रणनीती : २ मंत्री, १ आमदार चर्चेने मार्ग काढणार जरांगे यांनी मुंबईत येऊ नये, असे सरकारचे प्रयत्न आहेत. त्यासाठी आझाद मैदान, दक्षिण मुंबईतील आंदोलनासाठी निर्बंध लागू केले आहेत. मराठा आरक्षण उपसमिती पाठवून जरांगे यांच्या मनधरणीचे प्रयत्न झाले. आता जीआर काढणे, अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत आहेत. आंदोलन लांबल्यास मंत्री शंभूराज देसाई, उदय सामंत, आमदार लाड चर्चेतून मार्ग काढू शकतील, असा अंदाज आहे. थेट प्रश्न: ५८ लाख नोंदींचा हिशेब जुळवून देऊ: शंभूराज देसाई, सदस्य, मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमिती उपसमितीच्या भेटीनंतरही जरांगे पाटील यांचे समाधान का झाले नाही?
शंभूराज देसाई : आम्ही जी आश्वासने दिली त्यावर दोन बैठका झाल्या. समितीचे अध्यक्ष विखे पाटील त्यांना लेखी कळवणार आहेत. ५८ लाख नोंदी कशा जुळवणार?
शंभूराज देसाई : चर्चेच्या दिवशीच आम्ही त्यांना एकूण नोंदींची माहिती दिली. यात जुन्या किती, नव्या किती सापडल्या, याची माहिती त्यांना हवी असेल तर हिशेब जुळवून आम्ही त्यांना देऊ. हैदराबाद गॅझेटनुसार पडताळणी मिळण्यात काय अडचणी आहेत?
शंभूराज देसाई : पडताळणी करताना वंशावळ जुळवावी लागते. प्रत्येकाच्या अर्जावर स्वतंत्रपणे काम करावे लागते. यात दुसरी कोणतीही अडचण नाही. आरक्षणासोबत जरांगे पाटील यांच्या इतर मागण्या कशा पूर्ण करणार?
शंभूराज देसाई : अण्णासाहेब पाटील महामंडळाला नियमित व्याज परतावा वर्षाला २५०-३०० कोटी होता. तो आम्ही ७५० कोटी रुपये केला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *