Headlines

मराठवाडा मित्र मंडळ ट्रस्टने केले शैक्षणिक सहकार्य करार:विद्या प्रतिष्ठान आणि भक्तिवेदांत रिसर्च सेंटरसोबत संशोधन उपक्रम राबवणार




मराठवाडा मित्र मंडळ ट्रस्टने (MMMT) शैक्षणिक आणि संशोधन सहकार्यासाठी दोन महत्त्वाचे करार केले आहेत. यामध्ये विद्या प्रतिष्ठान ट्रस्ट आणि शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स (बारामती) यांच्याशी एक करार, तर मराठवाडा मित्र मंडळाचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कर्वेनगर, पुणे आणि भक्तिवेदांत रिसर्च सेंटर, पुणे यांच्यात दुसरा करार समाविष्ट आहे. हे करार संयुक्त कार्यशाळा, संशोधन आणि विद्यार्थी-प्राध्यापक देवाणघेवाण उपक्रमांना चालना देतील. विद्या प्रतिष्ठान ट्रस्ट आणि शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स (बारामती) यांच्यासोबतच्या करारप्रसंगी प्राचार्य डॉ. सचिन साखरे, उपप्राचार्य श्रीमती स्वाती देशमुख, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स विभागाचे प्रमुख डॉ. धनराज धोत्रे आणि बारामती विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधीर लांडे उपस्थित होते. या सहकार्यांतर्गत, दोन्ही संस्था संयुक्तपणे संशोधन प्रकल्प, चर्चासत्रे आणि प्राध्यापक विकास कार्यक्रम राबवतील. तसेच, विद्यार्थी आणि प्राध्यापक देवाणघेवाण उपक्रम हाती घेतील. अभ्यासक्रम रचना, इंटर्नशिप, नोकऱ्या, लाइव्ह प्रोजेक्ट्स, प्रत्यक्ष प्रशिक्षण, उद्योग भेटी आणि अतिथी व्याख्याने यांचाही या करारामध्ये समावेश आहे. दुसरा करार मराठवाडा मित्र मंडळाचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कर्वेनगर, पुणे आणि भक्तिवेदांत रिसर्च सेंटर, पुणे यांच्यात झाला. यावेळी मराठवाडा मित्र मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष भाऊसाहेब जाधव, प्राचार्य डॉ. सचिन साखरे, उपप्राचार्य स्वाती देशमुख, विभागप्रमुख डॉ. ए.एस. भातलवंडे, रमेश पंडित, भक्तिवेदांत रिसर्च सेंटरचे प्रा. डॉ. के.एन. धुमाळ, डॉ. सुमंत रुद्र, प्रा. डॉ. जनार्दन चितोडे, संजय भोसले, भूषण कुमार आणि कदंब कानन प्रभू उपस्थित होते. या सामंजस्य करारांतर्गत संयुक्त कार्यशाळा, परिसंवाद, फॅकल्टी डेव्हलपमेंट कार्यक्रम, संशोधन उपक्रम, विद्यार्थी कल्याण व मूल्याधारित शिक्षण, सामाजिक उपक्रम तसेच शैक्षणिक देवाणघेवाण राबविण्यात येणार आहे. या दोन्ही सहकार्यांचा प्रमुख उद्देश भारतीय ज्ञान प्रणाली आणि सार्वत्रिक मानवी मूल्यांचा आधुनिक शिक्षणाशी समन्वय साधून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे आहे. यामुळे संशोधन आणि सामाजिक बांधिलकी वाढीस लागेल, अशी अपेक्षा आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *