Headlines

मराठवाड्याचा विकास, तुम से ना हो पायेगा:कॅम्ब्रिज चौक उड्डाणपुलाच्या कोनशिलेला गाजराचा हार घालत ठाकरेंच्या शिवसेनेचे आंदोलन




मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मराठवाड्याचा विकास, तुम से ना हो पायेगा! या मराठवाडाव्यापी जनआंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. महायुती सरकार केवळ प्रकल्पांच्या घोषणा करून जनतेला ‘गाजर’ दाखवत असल्याचा आरोप करत, ठाकरेंच्या शिवसेनेने कॅम्ब्रिज चौक ते नगर नाका उड्डाणपुलाच्या रखडलेल्या कामाचा निषेध करण्यासाठी रविवार, 6 सप्टेंबर रोजी जुन्या अनावरण पत्रिकेला गाजराचा हार घालून अनोखे आंदोलन केले. आंदोलनावेळी बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, 25 डिसेंबर 2015 रोजी तत्कालीन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते माजी पंतप्रधान स्व.अटल बिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 17,706 कोटी रुपयांच्या घोषणांचा पाऊस पाडण्यात आला होता. याच कार्यक्रमात ‘कॅम्ब्रिज चौक ते नगर नाका’ या भव्य उड्डाणपुलाच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले होते. मात्र, इतकी वर्षे उलटूनही या प्रकल्पाचे काम 1 टक्कासुद्धा झालेले नाही, असा टोला अंबादास दानवेंनी लगावला आहे. नारळ फोडायचे अन् कोनशिला उभ्या करायच्या अंबादास दानवे म्हणाले की, केवळ नारळ फोडायचे, कोनशिला उभ्या करायच्या आणि जनतेला रोज नवी गाजरे दाखवायची, हाच या महायुती सरकारचा धंदा आहे. सरकारच्या या ढोंगीपणाचा आणि तोंडाला पाने पुसण्याच्या कारभाराचा निषेध म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जुन्या अनावरण पत्रिकेला गाजराचा हार घालून सरकारला ‘योग्य’ तो आरसा दाखवला आहे, असे दानवे यांनी म्हटले आहे. घोषणांचा डोंगर अन् कामाचा भोपळा अंबादास दानवे म्हणाले की, छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी केवळ कागदावर घोषणा केल्या जात असून प्रत्यक्षात कामे ठप्प आहेत. महायुतीच्या या घोषित ‘कामांची’ पोलखोल करण्यासाठीच हे प्रतीकात्मक आंदोलन छेडण्यात आले. हे ही वृत्त वाचा देशात धर्माची झिंग:लोकांना धर्मांध करून मूळ प्रश्नांवरून लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न, महापुरुषांच्या रांगेत पंतप्रधानांचा फोटो नको, दुसरीकडे लावा- राज ठाकरे
राज्यातील जनतेना वेगळ्या गोष्टीमध्ये गुंतवण्याचे काम सुरू आहे. देशात धर्मांची झिंग आली आहे, देवावरची श्रंद्धा, धर्माबद्दलचा अभिमान इतके आपण समजू शकतो पण माणसांनी धर्मांध असू नये. आपल्या धर्मांचा आपल्याला अभिमान असला पाहिजे, पण ज्या प्रकारे देशात वातावरण आहे ते तयार केले जात आहे, तुमच्यामध्ये राग निर्माण केला जात असून तुमचे लक्ष दुसरीकडे जाऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत,असे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *