Headlines

BJP Navnath Ban Slams Opposition Over Student Politics


राहुल गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा प्रा. लिमिटेड पक्ष बंद झाले आहेत त्यांचे राजकारण सुरू रहावे यासाठी त्यांच्याकडून विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा फायदा घेण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे.

.

नवनाथ बन म्हणाले की, शरद पवार केंद्रीय कृषीमंत्री होते त्यावेळी हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. कर्नाटकामध्ये अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी करणारे देवाभाऊंचे सरकार आहे. तुम्ही केवळ घोषणा केल्या आणि त्या घोषणांची पुर्तता देवाभाऊंनी केल्या.

कर्जमाफी देवाभाऊंनीच दिली

नवनाथ बन म्हणाले की, काँग्रेस सरकार असणाऱ्या राज्यात पेपरफुटी झाली. त्याबद्दल राहुल गांधी काही बोलत नाही.विद्यार्थ्यांच्या जीवावर आपले राजकीय करिअर सेट करावे हा राहुल गांधींचा विचार आहे. त्यातूल फेक नरेटीव्ह पसरवत आहे. राजकारण सेट करण्यासाठी रोहित पवार, संजय राऊत आणि राहुल गांधी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा आंदोलनाचा फायदा घेतला जात आहे.

खासदारकी जाताच राऊत काँग्रेसमध्ये प्रवेश करतील

नवनाथ बन म्हणाले की, शिवसेनेचे लोकं पुन्हा उबाठा गटात येणार आहेत, भाजपचे लोकं कुठे जाणार आहेत, हे सांगण्यापेक्षा 2028 ला खासदारकी गेली की संजय राऊत हे काँग्रेसमध्ये जाणार असल्याचे त्यांनी एकदा सांगूण टाकले पाहिजे. त्यांनी राहुल गांधी यांची गुलामी स्वीकारली असून खासदारकीसाठी तुम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश नाहीतर उबाठागटाचे विलीनीकरण करणार आहात. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना घेऊन काँग्रेस किंवा समाजवादी पार्टीमध्ये जायचे हा विचार मातोश्रीवर सुरू आहे.

राऊतांना औरंगजेब अन् अफजलखानाच्या पिलावळीची चिंता

नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत यांनी विश्व हिंदू परिषदेची चिंता करू नये कारण विश्व हिंदू परिषद हिंदूंची चिंता करते. मात्र तुम्ही औरंगजेब आणि अफजल खानाच्या पिलावळीची चिंता करतात. महागाईचा काळ काय होता हे आपण काँग्रेसच्या काळात पाहिले आहे. भाजपच्या काळात महागाई वाढली नाही. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत कधीच बाजारात गेले नाही तुम्हाला सामान्य जनतेशी काही देणंघेणं नाही.

हे ही वृत्त वाचा

संघ अन् विश्व हिंदू परिषदेची दुटप्पी भूमिका:अमेरिकेत सलोख्याची भाषा अन् इथे टिळ्याची अट, लोकसेवा आयोग बरखास्त करा- संजय राऊत

मुस्लीम आणि हिंदू बांधवांमध्ये समाजिक सलोखा राहिला पाहिजे अशी भाषा सरसंघचालक अमेरिकेत वापरतात आणि संघाचा भाग असलेली विश्व हिंदू परिषद टिळा लावल्याशिवाय दांडिया खेळायला येऊ देऊ नये असे सांगते ही त्यांची दुटप्पीभूमिका आहे, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.