![]()
राज्यातील जनतेना वेगळ्या गोष्टीमध्ये गुंतवण्याचे काम सुरू आहे. देशात धर्मांची झिंग आली आहे, देवावरची श्रंद्धा, धर्माबद्दलचा अभिमान इतके आपण समजू शकतो पण माणसांनी धर्मांध असू नये. आपल्या धर्मांचा आपल्याला अभिमान असला पाहिजे, पण ज्या प्रकारे देशात वातावरण आहे ते तयार केले जात आहे, तुमच्यामध्ये राग निर्माण केला जात असून तुमचे लक्ष दुसरीकडे जाऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत,असे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटले आहे. राज ठाकरे म्हणाले की, काही लोकं टीव्हीवर येतात आणि जे तोंडाला येतात ते लोकांना सांगत असतात. राम आणि रावणांचे जेव्हा युद्ध झाले त्यावेळी रावणाचे 1 लाख मुलं आणि दीड लाख नातू मारले गेले. मला जितकं माहिती आहे की रावणाला केवळ 10 तोंड होती. एक लाख मुलं होती रावणमध्ये जेवला का नाही? काहीही स्टोऱ्या हे लोकं सांगत असतात. देश कुठे चालला आहे आणि हे लोक भस्म लावत काय स्टोरी सांगत आहे. महापुरुषांच्या रांगेत पंतप्रधानांचा फोटो नको राज ठाकरे म्हणाले की, अमित ठाकरे पुण्यात गेले त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो काढण्यावरून वाद झाला. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या रांगेत दुसरे कोणी बसू शकत नाही. पंतप्रधानांचा फोटो सरकारी कार्यालयात लावला जावा का तर हो पण तो दुसऱ्या भींतीवर लावला पाहिजे. महापुरुषांच्या रांगेत पंतप्रधानांचा फोटो लावू नये. पण कोणत्या रांगेत कोणाचा फोटो पाहिजे हे सर्वांना कळले पाहिजे. त्यामुळे आताच ही गोष्ट सुधारवा. देशाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट राज ठाकरे म्हणाले की, नरेंद्र मोदी यांनी परदेशात जात भारतीयांना सांगितले की परदेशात जाऊ नका, सोनं खरेदी करू नका. देशाचा जीडीपी जर इतर देशापेक्षा जास्त असेल तर परदेशात जायचे का नाही? सोनं खरेदी का करायचे नाही? जेव्हा टंचाई असते तेव्हाच आपण पैसे वाचवतो. आर्थिक परिस्थिती खूप खराब झाली आहे. आज केवळ जेनझी रस्त्यावर आले उद्या संपूर्ण देश रस्त्यावर येईल. तुम्हाला जातीयवाद, धार्मिक तेढ यामध्ये गुंतवायचे म्हणजे तुम्ही काही दुसरे बोलणार नाही. ही लोकं पत्रकारांना बातम्याच देऊ देत नाही. म्हणून सोशल मिडीयावर लोकं व्यक्त होतात. दहीहंडीतील बीभत्स नाचगाण्यांवर ताशेरे राज ठाकरे म्हणाले की, अविनाश जाधव यांनी मुंबईतील सर्वांत चांगली दहीहंडी साजरी केली. त्यांना तिथे नाच ठेवला ना गाणी सर्व जण जय जय महाराष्ट्र या गाण्यावर नाचत होते, असे म्हणत दहीहंडी उत्सवातील नाचगाण्यावर टीका केली आहे.
हे ही वृत्त वाचा संघ अन् विश्व हिंदू परिषदेची दुटप्पी भूमिका:अमेरिकेत सलोख्याची भाषा अन् इथे टिळ्याची अट, लोकसेवा आयोग बरखास्त करा- संजय राऊत
मुस्लीम आणि हिंदू बांधवांमध्ये समाजिक सलोखा राहिला पाहिजे अशी भाषा सरसंघचालक अमेरिकेत वापरतात आणि संघाचा भाग असलेली विश्व हिंदू परिषद टिळा लावल्याशिवाय दांडिया खेळायला येऊ देऊ नये असे सांगते ही त्यांची दुटप्पीभूमिका आहे, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर
Source link