Headlines

मराठवाड्यासाठी गौरवाचा क्षण:‘अर्थसंवाद’च्या प्रमुख संपादकपदी प्रा. डॉ. मारोती तेगमपुरे यांची निवड; अर्थशास्त्र परिषदेच्या राष्ट्रीय अधिवेशनात निर्णय




मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या प्रतिष्ठित ‘अर्थसंवाद’ या संशोधन नियतकालिकाच्या प्रमुख संपादकपदी अंबड येथील गोदावरी कला महाविद्यालयाचे अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. मारोती तेगमपुरे यांची निवड करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातील विटा येथील रयत शिक्षण संस्थेच्या बळवंत महाविद्यालयात 13, 14 व 15 नोव्हेंबर 2026 दरम्यान झालेल्या परिषदेच्या 49 व्या राष्ट्रीय वार्षिक अधिवेशनात कार्यकारिणीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. या निवडीमुळे ‘अर्थसंवाद’च्या संपादकीय धुराचा मान पहिल्यांदाच मराठवाड्याला मिळाला आहे. सुवर्णमहोत्सवी वाटचाल आणि ‘अर्थसंवाद’चा वारसा 9 जानेवारी 1977 रोजी स्थापन झालेली मराठी अर्थशास्त्र परिषद आता सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. गेल्या 5 दशकांपासून या परिषदेने अर्थशास्त्र विषयातील संशोधन आणि वैचारिक चिंतनाला मोठे व्यासपीठ मिळवून दिले आहे. परिषदेचे मुखपत्र असलेल्या ‘अर्थसंवाद’मधून सातत्याने अभ्यासपूर्ण विश्लेषणे आणि संशोधनपर लेख प्रसिद्ध केले जातात. आजवर अनेक नामवंत अर्थतज्ज्ञांनी या नियतकालिकाचे संपादन केले असून, आता डॉ. तेगमपुरे यांच्या निवडीमुळे या गौरवशाली परंपरेत मराठवाड्याचे प्रतिनिधित्व अधोरेखित झाले आहे. आतापर्यंत 11 ग्रंथांचे लेखन प्रा. डॉ. तेगमपुरे हे अर्थशास्त्राचे अभ्यासक असण्यासोबतच सामाजिक आणि शैक्षणिक चळवळींमधील सक्रिय व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांनी सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक विषयांवर आतापर्यंत 11 ग्रंथांचे लेखन, अनुवाद आणि संपादन केले आहे. यामध्ये आदिवासी विकास आणि वास्तव, भारतीय शेतीची अवस्था (अनुवादित), भाषा, विकास आणि राजकारण, जागतिकीकरण आणि भारत, महात्मा बसवेश्वर : काल आणि कर्तृत्व, आम्ही लढलो आम्ही घडलो, डीसीपीएस : काळोखाचा जाहीरनामा, नवीन शैक्षणिक धोरणात आम्ही भारताचे लोक कुठे?, सावित्रीबाई फुले रचित काव्यफुले (संपादन), शिक्षण : प्रश्न अनेक-उत्तर एक, अर्था-अर्थी : जागतिकीकरणानंतरचे पेच या पुस्तकांचा समावेश आहे. या लेखनातून त्यांनी कृषी प्रश्न, आर्थिक विषमता, जागतिकीकरण, शिक्षणव्यवस्था आणि वंचित घटकांच्या विकासाची सखोल चिकित्सा केली आहे. संघटनात्मक व संस्थात्मक कार्य संशोधन आणि लेखनासोबतच त्यांचा संघटनात्मक कार्यातही सक्रिय सहभाग राहिला आहे : नवोदित संशोधकांना मिळणार नवे व्यासपीठ अर्थशास्त्राचा सखोल अभ्यास, संपादनाचा अनुभव आणि व्यापक संघटनात्मक कार्य लक्षात घेऊन त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली नियतकालिकाच्या वाटचालीला नवी दिशा मिळेल आणि मराठवाड्यातील प्राध्यापक, संशोधक व नवोदित लेखकांना आपले विचार मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या निवडीबद्दल शैक्षणिक, संशोधन, सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *