![]()
सामाजिक क्रांतीचे आद्य प्रणेते, कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधून सर्वप्रथम जयंती साजरी करणारे महामानव, आधुनिक भारतात स्त्री-पुरुष समतेचा पाया घालणारे, सर्वासाठीच शिक्षणाची कवाडे खुली करणारे आद्य शिक्षण तज्ज्ञ, शेतकऱ्यांचे कैवारी,
.
महात्मा फुले यांनी या देशातील सर्वांसाठी शिक्षणाची दारे खुली करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. त्यांच्यासह सावित्रीबाई फुले यांनीही महिलांच्या शिक्षणाचा विडा उचलला. एवढेच नव्हे तर संपूर्ण समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य केले, अशा सामाजिक क्रांतीच्या महान शिक्षण तज्ज्ञांना देशातील सर्वाधिक प्रतिष्ठेचा सन्मान मिळायलाच हवा, असे विचार सर्वशाखीय माळी संघ ऋणानुबंधच्या बैठकीत उपस्थितांनी व्यक्त केले.
सर्वशाखीय माळी संघ ऋणानुबंधच्या पदाधिकारींची नुकतीच बैठक झाली. माजी उपमहापौर डॉ. गणेश खारकर अध्यक्षस्थानी होते.
प्रारंभी महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले. सर्वश्री ओमप्रकाश अंबाडकर, डी.एस. यावतकर, नंदकिशोर वाठ, अनिल भगत आदिंनी समयोचित विचार व्यक्त केले. याप्रसंगी आजीवन सदस्य रामकुमार खैरे व वसंत भडके यांचे वाढदिवसानिमित्त ऋणानुबंध टीमच्या वतीने पुष्पगुच्छ, वृक्षरोपटे व डॅा. प्रवीण बनसोड लिखित विचारपुष्प देवून सत्कार करण्यात आला. त्यांना सर्वश्री प्रदीप लांडे, नीळकंठ बोरोडे, गोविंदराव फसाटे, एम.आर. होले आदिंनी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी विवाह इच्छुकांना योग्य जीवनसाथी संदर्भात मार्गदर्शन तसेच विवाहपूर्व व विवाहोत्तर कौटुंबिक समुपदेशनासाठी सर्वज्ञ, वऱ्हाड विकास, किशोर नगर, अमरावती येथील मुख्य कार्यालय २४ तास १२ ही महिने सुरू असल्याचे जाहीर करण्यात आले. मधुकर आखरे यांनी आभार प्रदर्शन केले.
परिवर्तनवादी विचारांना गतीशील करण्यासाठी संघाची स्थापना संस्थापक महासचिव प्रा.श्रीकृष्ण बनसोड हे मार्गदर्शन करतांना म्हणाले, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुरोगामी व परिवर्तनवादी विचारांना गतीशील करण्यासाठी गेल्या तीन दशकापूर्वी सर्वशाखीय माळी संघाची स्थापना करण्यात आली. माळी ऋणानुबंध ॲपच्या माध्यमातून देश-विदेशातील उपवर युवक-युवतींना योग्य लाईफ पार्टनर मिळवून देणारी लोकचळवळ झाली आहे. त्यामुळेच इंडिया बुक ऑफ रेकॅार्डस व वर्ल्ड युनिव्हर्सिटीने दखल घेतली असून ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. संघाने मागील तीन दशकांपासून समाज कार्याला वाहून घेतले आहे.