Headlines

महापालिकेतील नोकरीच्या आमिषाने अभियंत्याची फसवणूक: 10 लाख रुपये घेतल्याप्रकरणी निलंबित शिपाई शिवानंद पाटील आणि अमित देशपांडे यांच्यावर गुन्हा दाखल



पुणे महापालिकेत नोकरीच्या आमिषाने अभियंत्याची १० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणातील आरोपी महापालिकेतील निलंबित शिपाई शिवानंद पाटील आणि अमित देशपांडे यांच्याविरुद्ध विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्या

.

याबाबत एकाने फिर्याद दिली आहे. तक्रारदार हे अभियंते आहेत. पाषाण येथील एका कंपनीत हार्डवेअर इंजिनीअर म्हणून काम करतात. २०११ ते २०१८ या कालावधीत ते पुणे महापालिकेत कंत्राटी पद्धतीने कॉम्प्युटर हार्डवेअर इंजिनीअर म्हणून कार्यरत होते. त्या वेळी त्यांची शिवानंद पाटील याच्याशी ओळख झाली होती.पाटील याने आपण महापालिकेत मोठ्या पदावर अधिकारी असल्याचे महाजन यांना सांगितले होते. त्यानंतर २०२३ मध्ये त्याने तक्रारादरारांशी संपर्क साधला. महापालिकेत टंकलेखक पदाच्या जागा रिक्त आहेत. कायमस्वरूपी नोकरी लावून देण्याचे आमिष त्याने दाखविले. त्यानंतर पाटील हा अमित देशपांडे याला सोबत घेऊन तक्रारदारांकडे आला. त्यावेळी तक्रारदाराने दोघांना १० लाख रुपये दिले. पैसे दिल्यानंतर त्यांनी चौकशी केली. तेव्हा आरोपींनी महापालिकेचे बनावट नियुक्तीपत्र, तसेच अधिकाऱ्याची बनावट स्वाक्षरी केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. हा प्रकार १ जानेवारी २०१८ ते १३ डिसेंबर २०२४ या कालावधीत घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस उपनिरीक्षक राऊत तपास करत आहेत.

शिवानंद पाटील आणि अमित देशपांडे हे दोघेही फसवणुकीच्या गुन्ह्यात येरवडा कारागृहात आहेत. त्यांच्याविरुद्ध शिवाजीनगर, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यासह शहरातील अन्य पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *