Headlines

महिला शेतकऱ्यांच्या हाताला बियाण्यांची साथ‎:मेळघाटातील 45 गावांमध्ये पोहोचला ‘बीज मदत'' उपक्रम, 200 महिला सहभागी‎




समाज प्रगती सहयोग, मेळघाट कार्यालय येथे बुधवार १७ रोजी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला आणि समाज प्रगती सहयोग यांच्या संयुक्त विद्यमाने बीज मदत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी २०० महिला व ५० पुरुष शेतकऱ्यांना विविध बियाण्यांची मदत करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून सहायक जिल्हाधिकारी धारणी, सिद्धार्थ शुक्ला तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सहायक वनरक्षक, अकोट सुमित कुमार आणि तालुका कृषी अधिकारी उमेश जाधव उपस्थित होते. कार्यक्रमास डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथील डॉ. लांडे, डॉ. सचिन शिंदे, माने आणि डॉ. मते यांचीही विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात समाज प्रगती सहयोगचे स्वामी डुरके यांनी प्रास्ताविकातून केली. त्यांनी समाज प्रगती सहयोग आणि कृषी विद्यापीठ यांच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात राबवण्यात आलेल्या संयुक्त उपक्रमांचा आढावा घेतला. यामध्ये मागील रब्बी हंगामात २०० शेतकऱ्यांना प्रत्येकी ३० किलो हरभरा बियाणे तसेच ३० कृषी पंपांची मदत करण्यात आल्याची माहिती दिली. यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, हा केवळ बीज वाटप कार्यक्रम नसून ‘बीज मदत कार्यक्रम’ आहे. या कार्यक्रमाचा लाभ घेणाऱ्या महिला शेतकरी भगिनींनी पुढील वर्षी स्वतःच्या उत्पादनातून प्राप्त बीज लाभाचा हिस्सा इतर गरजू शेतकरी महिलांना देऊन या उपक्रमात योगदान द्यावे, तसेच बियाण्यांचे संगोपन करून शाश्वत शेतीला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमांतर्गत १८५ शेतकऱ्यांना लाल तूर, तसेच ५० शेतकऱ्यांना सोयाबीन, इतर राळा, कुटकी आणि नाचणी या पिकांच्या बियाण्यांचे मदत करण्यात आले. धारणी तालुक्यातील सुमारे ४५ गावांमधील २०० महिला आणि ५० पुरुष शेतकरी या कार्यक्रमात सहभागी झाले. कार्यक्रमादरम्यान कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी बियाण्यांची प्रक्रिया, उगवणक्षमता आणि खरीप हंगामात शेती करताना घ्यावयाची काळजी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *