![]()
रामायणातील सीतेच्या जगण्याचे भावविश्व आणि तिच्या वाट्याला आलेला संघर्ष, सुप्रसिद्ध लेखिका डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी यांच्या कसदार वाचिक अभिनयातून उलगडत गेला आणि नगरकर रसिक त्यात पूर्णपणे रमून गेले. निमित्त होते, अहिल्यानगर जिल्हा वाचनालयाच्या वतीने आय
.
वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात डॉ. कुलकर्णी यांनी सुप्रसिद्ध साहित्यिका डॉ. अरुणा ढेरे लिखित “सीतेची गोष्ट’ या कथेचे बहारदार अभिवाचन केले. या प्रसंगी व्यासपीठावर वाचनालयाचे सहकार्यवाह डॉ. राजा ठाकूर, संचालिका शिल्पा रसाळ, ज्योती कुलकर्णी, राहुल तांबोळी आणि ग्रंथपाल अमोल इथापे उपस्थित होते.
डॉ. वंदना कुलकर्णी यांच्या संवादातील चढ-उतार आणि प्रभावी वाचिक अभिनयामुळे सीतेच्या आयुष्यातील विविध प्रसंग रसिकांच्या डोळ्यांसमोर जिवंत झाले. लव-कुशाची माता, रामाची पत्नी, भरत-लक्ष्मणाची वहिनी आणि दाई वसूमाईची कन्या अशा विविध रूपांतील सीतेच्या नात्यांना त्यांनी आपल्या सादरीकरणातून न्याय दिला.
वाल्मिकी रामायणात नसलेले अनेक सूक्ष्म संदर्भ “सीतेची गोष्ट’ या कथेतून समोर येतात. ज्या शिवधनुष्याचा घोडा करून ती लहानपणी खेळली, तेच धनुष्य पुढे रामाने मोडले; हा विरोधाभास कथेमध्ये अत्यंत तरलतेने मांडला आहे. कार्यक्रमाचे स्वागत डॉ. राजा ठाकूर यांनी केले. प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय शिल्पा रसाळ यांनी करून दिला. आभार ज्योती कुलकर्णी यांनी मानले. व्याख्यानमालेच्या यशस्वीतेसाठी ग्रंथपाल अमोल इथापे, नितीन भारताल, पल्लवी कुक्कडवाल, वर्षा जोशी, संकेत फाटक, आर्यन मडुर व संजय गाडेकर यांनी परिश्रम घेतले.
लेखिकेची प्रचंड प्रतिभाशक्ती “सीता हे पात्र त्रेतायुगातील असले, तरी डॉ. अरुणा ढेरे यांनी ही कथा २१ व्या शतका सुसंगत अशी लिहिली आहे. लेखिकेची प्रतिभाशक्ती आणि कल्पकता यांमुळे रामायणातील सीतेचे प्रगल्भ रूप आजच्या पिढीलाही तितकेच भावते. जे आपण स्वतः प्रस्थापित केले, त्याचे विसर्जन आपणच केले पाहिजे, हा मोलाचा विचार ही कथा देऊन जाते,” असे डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.