Headlines

माळशिरसमध्ये एक लाखांहून अधिक सीडबॉलची निर्मिती:हरित वारी उपक्रमात 6 शाळांमधील 500 हून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग‎




प्रतिनिधी | अकलूज पर्यावरण संवर्धनासाठी माळशिरसमध्ये हरित वारी उपक्रमांर्गत जीवन सहारा परिवार, जैन सोशल ग्रुप अकलूज, माळशिरस पोलिस ठाणे आणि से ट्रीज कंपनी व ‘ दिव्य मराठी’ यांच्या संयुक्त विद्यमाने एक लाखांहून अधिक सीडबॉलची निर्मिती करण्यात आली. समाजातील विविध घटकांच्या सहभागातून पर्यावरण संरक्षणाचा प्रभावी संदेश देणारा हा उपक्रम प्रेरणादायी ठरला. सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माळशिरस पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दशरथ वाघमोडे, रोकडे आणि डूबल यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जैन सोशल ग्रुप व जीवन सहारा परिवारचे सीए अमित दोशी, प्रितेश गांधी, पियुष दोशी, गौरव फडे, अमोल वैद्य, सुरेंद्र दोभाडा, मयूर दोशी, सतीश दोशी, डॉ. निलेश फडे, अल्पेश दोशी, बाहुबली गांधी तसेच से ट्रीजचे प्रोजेक्ट मॅनेजर दादा वाघमोडे आणि कृष्णा वाघमोडे यांनी विशेष परिश्रम घेतले. माळशिरस पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिकांनी या उपक्रमाला उपस्थित राहून पर्यावरण संवर्धनाच्या या संकल्पनेचे स्वागत केले. पर्यावरण रक्षणाची जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प माळशिरस येथील गोपाळराव देव प्रशाला, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले प्रशाला, कन्या प्रशाला, माळशिरस प्रशाला, मारुती नाना कुलकर्णी प्राथमिक विद्यालय आणि आप्पासाहेब देशमुख विद्यालय या शाळांतील ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग होत पर्यावरण रक्षणाची जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *