Headlines

‘मित्र साधना शिक्षण प्रसारक मंडळा'ला ‘आदर्श शैक्षणिक संस्था’ पुरस्कार प्रदान




फुलंब्री ग्रामीण भागातील शैक्षणिक आणि सामाजिक विकासात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या फुलंब्री तालुक्यातील ‘मित्र साधना शिक्षण प्रसारक मंडळ (पाथ्री)’ या संस्थेला धाराशिव येथे ‘आदर्श शैक्षणिक संस्था’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते शुक्रवारी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. संस्थेच्या वतीने सहसचिव वरुण पाथ्रीकर आणि डॉ. सचिन मोरे यांनी हा सन्मान स्वीकारला. “हा गौरव म्हणजे केवळ संस्थेचा सन्मान नसून, यामुळे संपूर्ण शैक्षणिक विभागाच्या कामाला नवी दिशा आणि मोठी चालना मिळणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडत दर्जेदार शिक्षण देण्याचा आमचा संकल्प यामुळे अधिक दृढ झाला असल्याचे सहसचिव वरुण पाथ्रीकर यांनी सांगितले. धाराशिव येथील आदर्श शिक्षण संस्थेच्या प्रांगणात हा सोहळा पार पडला. मित्र साधना शिक्षण प्रसारक मंडळाने शैक्षणिक गुणवत्ता, कौशल्यविकास, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि सामाजिक बांधिलकी या त्रिसूत्रीवर भर देत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष द्वारका पाथ्रीकर, सचिव उषा पाथ्रीकर आणि उपाध्यक्ष राजू पाथ्रीकर यांनी सर्व प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी व पालकांचे कौतुक केले. हा पुरस्कार भावी शैक्षणिक वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या यशामुळे परिसरातून संस्थेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *