Headlines

मुंढवाप्रकरणी सुनेत्रा पवारांच्या 2 पीएंना नोटीस:राष्ट्रवादी काँग्रेसची देवगिरीवर खलबतं; उपमुख्यमंत्री पवारांसह नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला वर्षावर




कोरेगाव पार्क (मुंढवा) येथील 40 एकर जमीन गैरव्यवहार प्रकरणात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या दोन स्वीय सहायकांना पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने नोटीस बजावल्याची मोठी बातमी समोर आली आहे. या घडामोडीनंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, या पार्श्वभूमीवर आज सकाळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या ‘देवगिरी’ बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्त्वाची कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे दिग्गज नेते थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी ‘वर्षा’ निवासस्थानी पोहोचल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते अर्थखात्याच्या मागणीसाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले आहेत. मुख्यमंत्री यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी ही महत्त्वाची बैठक पार पडली असून, या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. तत्पूर्वी, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी सकाळी 9 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. तब्बल दीड महिन्यानंतर भरलेल्या या बैठकीत पक्षाच्या संघटनात्मक रचनेचा आढावा घेण्यात आला, तसेच पक्षांतर्गत बदलांबाबत सविस्तर चर्चा झाली. याच बैठकीत सध्या भाजपकडे असलेल्या अर्थखात्याबाबतही प्रमुख नेत्यांमध्ये खलबते झाल्याचे समजते. जे खाते ठरले ते मिळाले पाहिजे- अनिल पाटील मंत्री अनिल पाटील म्हणाले की, आज कोअर कमिटीच्या बैठकीनंतर सर्व जण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले. संपूर्ण राज्यात सरकार स्थापन करताना तिन्ही पक्षांनी कोणत्या पक्षाकडे कोणते खाते असेल, याचे धोरण आधीच निश्चित केले होते. परंतु, दादांच्या दुर्दैवी घटनेनंतर, जे काही ठरले होते ते खाते पक्षाला मिळायला पाहिजे, अशा अपेक्षा आता कार्यकर्त्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत. आणखी 8 ते 10 जणांची चौकशी ‘अमेडिया’ कंपनीतील संबंधितांना या गैरव्यवहाराची माहिती होती, असा दावा तेजवानी यांच्या वकिलांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रार अर्जात केला आहे. त्यावर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले की, तक्रार अर्जाच्या अनुषंगाने दोन स्वीय सहायकांना नोटीस बजावली आहे. याशिवाय आणखी 8 ते 10 जणांची चौकशी करून जबाब नोंदवले जातील. त्यानुसार तपासाची दिशा निश्चित केली जाईल. या प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे. या जमिनीत 275 जणांचा संबंध असून, संबंधितांनी शीतल तेजवानी यांना कुलमुखत्यारपत्र दिले होते. त्यानंतर ‘अमेडिया’चे भागीदार दिग्विजय पाटील यांनी तेजवानींकडून शेतजमीन नावावर असलेल्या व्यक्तींचे कुलमुखत्यारपत्र तयार करून घेतले. काय आहे आरोप? माहिती-तंत्रज्ञान पार्कच्या नावाखाली उद्योग संचालनालयाकडून इरादा पत्र घेत मुद्रांक शुल्कात 21 कोटी रुपयांची सवलत लाटण्यात आली. गुन्हे शाखेच्या पथकाने जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि मुद्रांक शुल्क कार्यालयातून या जमिनीची जुनी कागदपत्रे, सातबारा उतारे व नोंदी मिळवल्या आहेत. आतापर्यंत या प्रकरणात दोन ते तीन जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *