Headlines

Satej Patil Slams Maharashtra Govt Over Farmer Loan Waiver & Microfinance


सरकार म्हणतंय की, कर्जाचं पुनर्गठन करणार आहे. पण शेतकऱ्यांना यंदा उत्पन्नाचा एक पैसाही मिळालेला नाही, अशा परिस्थितीत पुनर्गठन करून शेतकरी कर्ज कसा फेडणार? आमची स्पष्ट मागणी आहे की, शासनाने शेतकऱ्यांचे पीक कर्ज शंभर टक्के सरसकट माफ करावे. तुम्ही एका ब

.

सतेज पाटील म्हणाले की, दिवाळीत 5 हजार रुपयांची मदत देऊन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची चेष्टा केली जात आहे, जे अत्यंत दुर्दैवी आहे. किमान 25 हजार रुपयांची मदत देऊन शासनाने शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी, जेणेकरून त्यांना काहीसा दिलासा मिळेल. राज्यात दुष्काळामुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडले आहेत. शासनाने एकीकडे शेतकऱ्यांकडून कर्जवसुली करू नये, असे निर्देश दिले असताना, दुसरीकडे मायक्रो फायनान्स कंपन्या शेतकऱ्यांची पिळवणूक करत आहेत. नांदेड आणि परभणीत मायक्रो फायनान्सच्या कर्जवसुलीच्या तगाद्याला कंटाळून शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. या अत्यंत दुर्दैवी घटनांचे राज्यात तीव्र पडसाद उमटत असून, गोकुळच्या विजयानंतर पुण्यात आलेल्या काँग्रेस नेते तथा आमदार सतेज पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्य सरकारवर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी सरसकट कर्जमाफीची आक्रमक मागणी केली.

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे

सतेज पाटील म्हणाले की, मायक्रो फायनान्स कंपनीच्या त्रासामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत, त्यामुळे अशा कंपन्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे. एका बाजूला सरकार सांगतंय की, बँका कर्जवसुलीसाठी दारात येणार नाहीत, मग मायक्रो फायनान्स कंपन्यांना ही सूट का? त्यांच्यावर कायदेशीर बंधने का नाहीत? असा सवाल त्यांनी केला आहे.

कृषी खात्याचे मंत्री-सहकार खात्याचे मंत्री कुठे?

सतेज पाटील म्हणाले की, आता कृषी खात्याचे मंत्री आणि सहकार खात्याचे मंत्री कुठे आहेत? त्यांचे कोणतेही विधान किंवा पंचनाम्याची माहिती समोर येत नाहीये. शासनाने सेबी आणि आरबीआयकडे याची तक्रार केली पाहिजे. ही सरकारची शेतकऱ्यांविषयीची अनास्था स्पष्ट दर्शवते. सरकारने कर्जवसुली करू नये असे सांगितले असताना, हे वसुली करणारे थेट शेतकऱ्यांच्या घरी कसे जातात? जर एकाही मायक्रो फायनान्स कंपनीवर कडक कारवाई झाली असती, तर इतर कंपन्यांचे असे धाडस झाले नसते.

हे ही वृत्त वाचा

पोलिस आयुक्तांचा मान राखत अदानींवरील डॉक्युमेंट्री डिलीट करतोय:डोळ्यांदेखत महाराष्ट्र विकला जातोय, तरी गप्प का?, राज ठाकरेंचा खासदार-आमदारांना सवाल

राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्या संबंधांवर भाष्य करणारी सबीर भाटिया यांची डॉक्युमेंट्री सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. या व्हिडिओला अवघ्या काही वेळात 48लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले. मात्र, मुंबई पोलिस आयुक्तांनी केलेल्या विनंतीचा मान राखत ही पोस्ट डिलीट करत असल्याचे राज ठाकरेंनी स्पष्ट केले. माझा विरोध कोणत्याही व्यक्तीला नसून देशात निर्माण होत असलेल्या एकाधिकारशाहीला आहे, असा पुनरुच्चार त्यांनी या पोस्टद्वारे केला आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.