Headlines

मुंबईत साकीनाका परिसरात अग्नितांडव:भंगार गोदामाला लागलेल्या भीषण आगीत दोघांचा होरपळून मृत्यू, 6 जण गंभीर जखमी; 70 गाळे आगीच्या विळख्यात




अंधेरी पूर्वेकडील साकीनाका परिसरात मंगळवारी सायंकाळी एका भंगार गोदामाला लागलेल्या भीषण आगीत दोघांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत 6 जण भाजले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांची ओळख अद्याप पटलेली नसून, त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. आगीने घेतले रौद्ररूप साकीनाका परिसरातील कैराणी रोडवर असलेल्या अब्दुल रशीद कंपाउंडमध्ये मंगळवारी सायंकाळी ही आग लागली. गोदामात मोठ्या प्रमाणावर भंगार आणि ज्वलनशील साहित्य असल्याने आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केले. अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तळमजला आणि अंशतः पहिला मजला असलेल्या या इमारतीतून आगीचे लोळ उठत होते. वाऱ्यामुळे आणि भंगार साहित्यामुळे आग वेगाने पसरली, ज्यामुळे परिसरातील तब्बल ६० ते ७० व्यावसायिक गाळे आणि चाळींना या आगीचा मोठा फटका बसला. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनंतर मध्यरात्री साडेबारा वाजता आग पूर्णपणे नियंत्रणात आणली. 6 जण गंभीर जखमी; एकाची प्रकृती चिंताजनक या भीषण आगीत 6 जण गंभीररीत्या भाजले गेले आहेत. त्यांना तातडीने उपचारांसाठी घाटकोपर येथील पालिकेच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी एका तरुणाची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. दरम्यान, आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अग्निशमन दल आणि स्थानिक पोलिसांकडून या दुर्घटनेचा सखोल तपास सुरू आहे. या घटनेमुळे साकीनाका आणि कैराणी रोड परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. —————— हेही वाचा.. कोल्हापूरहून दर्शन घेऊन परतताना काळाचा घाला: कराडजवळ कार-ट्रकच्या भीषण अपघातात 4 मित्रांचा जागीच मृत्यू, तिघे जखमी
कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेऊन गावी परतणाऱ्या तरुणांच्या गाडीला रविवारी रात्री अत्यंत भीषण अपघात झाला आहे. साताऱ्यातील कराडनजीक पुणे-बेंगळुरू महामार्गावरील नव्या उड्डाणपुलावर भरधाव ट्रकने स्कॉर्पिओ कारला मागून जोरदार धडक दिली. या दुर्दैवी घटनेत गाडीतील चार मित्रांचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व तरुण साताऱ्याच्या खटाव तालुक्यातील कातरखटाव येथील रहिवासी आहेत. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *