Headlines

Rohit Pawar Attacks Home Minister Over Goon Gangs Support in Maharashtra


देशात आणि राज्यात जर अघोषित आणीबाणी आली असेल, पोलिस प्रशासन जर नीट काम करत नसेल. कायदा आणि सुव्यवस्थेची जर वाट लागली असेल. सर्वांवर अन्याय होत असेल तर बदलून टाका हे सरकार काय हरकत आहे, सरकार काय बोलते यापेक्षा लोकं काय म्हणतात याला जास्त महत्त्च आहे,

.

रोहित पवार म्हणाले की, महाराष्ट्रात कलाकार, राजकीय नेते आणि सामान्य व्यक्तीवर गोळ्या झाडल्या जातात, हे बघितल्यावर तर असेच म्हणावे लागेल की या ज्या गुंडांच्या गँग आहेत त्यांना केंद्रीय गृहमंत्र्यांचा आणि राज्यातील गृहमंत्र्यांचा पाठिंबा आहे. जर पाठिंबा असेल तर तेच सत्ताधारी आहेत असे म्हणावे लागेल.

पदवीधरला प्रताप पाटील विजयी होणार

रोहित पवार म्हणाले की, मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा उमेदवार आज किंवा उद्या आपली भूमिका बदलेल असे मला वाटते. कारण सुप्रिया युळे उद्धव ठाकरे यांच्याशी बोलत आहेत. पण मविआचे जे कार्यकर्ते आहेत, ते प्रताप पाटील यांच्या पाठिशी आहेत. त्यांना 80 टक्के मतदान होईल. सतीश चव्हाण यांनी 2024 मध्येच हार मानली होती म्हणून त्यांनी गंगापूर विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यांच्या मागे जनता उभी राहील असे वाटत नाही.

शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपयांची मदत द्या

रोहित पवार म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना मेळावा समर्पित केल्याने शेतकऱ्यांचा काय फायदा नाही. त्यांनी शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपयांची मदत करावी. तर शेतमजूरांना 25 हजार रुपये प्रत्येक कुटुंब द्यावी. माता-भगिणींनी जे बचत गटाचे कर्ज घेतले, मुलांनी जे शैक्षणिक कर्ज घेतले ते माफ करा. ज्या विद्यार्थ्यांना फीस भरता येणार नाही त्याबद्दल निर्णय घ्या. एखादा कार्यक्रम किंवा सभा शेतकऱ्यांना समर्पित करण्यापेक्षा त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करा, तुमच्याकडे सरकार आहे.

पाण्याचा प्रश्न सोडवला पाहिजे

रोहित पवार म्हणाले की, दुष्काळामुळे 40 टक्के लोकं ग्रामीण भागाकडून शहरीभागाकडे जातील. जनावरांची किंमत पडायला लागली आहे. सरकारने शेतकऱ्यांना 1 लाख रुपये हेक्टरी मदत जाहीर केली पाहिजे. पिण्यासाठी पाणी वाढवले गेले पाहिजे आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा सोडवला गेला पाहिजे. ज्यावेळी शेतकरी अडचणीत येतो त्यावेळी त्यांच्या मुलांचे शिक्षण थांबवण्याशिवाय दुसरा काही पर्याय नसतो. त्यामुळे ते प्रवाहातून बाहेर पडू शकतात. सरकारने विद्यार्थ्यांच्या परीक्षा फीससह, सर्वच फीस माफ केली पाहिजे.

टीका करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या अडचणी महत्त्वाच्या

रोहित पवार म्हणाले की, आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा आज दुष्काळावर चर्चा होणं जास्त गरजेची आहे. मजुरांची, शेतकऱ्यांची जी अडचण आहे त्यावर बोलले गेले पाहिजे. आम्ही त्यावर लक्ष केंद्रित करत बोलत असतो. कोणी कोणावर काय टीका केली हे महत्त्वाचे नाही.

हे ही वृत्त वाचा

भांडुपमध्ये नगरसेवक निवडून आणायची धमक नाही:त्यांनी अमित शहा-मोदींवर बोलू नये; चित्रा वाघ यांचा राऊत-ठाकरेंवर पलटवार

शिवाजी पार्कवर पार पडलेल्या ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यातून भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका करण्यात आली होती. संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची तुलना थेट गुंड लॉरेन्स बिश्नोईशी केली होती, तर उद्धव ठाकरे यांनी मतदार याद्यांमधील घोळाचा आरोप केला होता. या सर्व आरोपांना भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा आणि आमदार चित्रा वाघ यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.