Headlines

'मुख्यमंत्री माझे ऐकतात ही दंतकथा':राज ठाकरेंचा पुण्यातून देवेंद्र फडणवीसांना टोला; दुर्ग प्रतिकृतीच्या उद्घाटन प्रसंगी शिवशाहीर पुरंदरेंच्या आठवणींना उजाळा




महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे गेल्या काही दिवसांपासून महायुती सरकारवर तसेच केंद्र सरकारच्या धोरणांवर सातत्याने टीका करत आहेत. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवरून तसेच भाजपने जे विरोधकांच्या आंदोलनांच्या विरोधात मोर्चे काढण्यास सुरुवात केली आहे, यावरून देखील ठाकरेंनी टोला लगावला होता. आता पुन्हा एकदा पुण्यात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपचे नेते म्हणाले होते, मुख्यमंत्री माझे ऐकतात, ही एक दंतकथा होती. पण आता बघू मुख्यमंत्र्यांशी बोलतो, ऐकले तर पाहुयात, असे मिश्किल भाष्य राज ठाकरे यांनी पुणे येथील दुर्ग प्रतिकृतीच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमात बोलताना केले. यावेळी त्यांनी इतिहासातील दंतकथेची गोष्ट सांगत राजकीय भाष्य केले. राज ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले, रायगडावर फिरू देत नाहीत, अशी तक्रार आहे. कदाचित त्यांना भीती वाटत असेल की कोणी पकडून टकमक टोकावरून कोणी घेऊन गेले तर, त्यामुळे रायगडावर मुक्कामाला बंदी असेल. खरे तर आज मला शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची आठवण आली. त्यांनी आज असायला हवे होते. त्यांनी इथे राहून इतिहास सांगावा आणि आपण तो पुढे बसून ऐकावा. असे ते हवे होते. मला त्यांना अनेकवेळा भेटण्याची ऐकण्याची संधी मिळाली. इतिहासाकडे कसे बघायचे हे त्यांच्याकडून याच मंडळींकडून समजले. आज इतिहासावर कोणी कधीच दावा सांगू नये, कारण कधी कोणती कागदपत्रे सापडतील, हे सांगता येणार नाही. आज कोणीही गाइड बनतो आणि दंतकथा बनवल्या जातात पुढे बोलताना राज ठाकरे यांनी किल्ल्यांवरील गाइडवर भाष्य केले. ते म्हणाले की, गडकिल्ल्यांवर गाइड असतात, मुळात त्यांनाच अभ्यासाची गरज आहे. प्रदेशात गाइड कोण असावे? हे तिथले सरकार ठरवतात. पण आपल्याकडे कोणी ही उठतं आणि गाइड बनतो. मग दंतकथा बनवल्या जातात, असा टोला ठाकरे यांनी यावेळी कोणाचेही नाव न घेत लगावला आहे. परदेशात पुतळे नसतात, कारण त्यांच्या रक्तात इतिहास असतो तसेच दंतकथा खूप प्रचलीत आहेत, कारण त्या रंजक आहेत. मात्र त्यामुळे कधी-कधी मूळ इतिहास बाजूला राहतो. पण इतिहासाच्या खोलात ही खूप जाऊ नये. बरं इतिहासाकडे पहावं, मात्र नुसते पुतळे उभारून होत नाही. आपल्याकडे नुसते पुतळ्यावर पुतळे उभारले जातात. बाबासाहेब मला म्हणाले होते, त्यांनी परदेशातील व्यक्तींची उदाहरणे दिले. तिकडे पुतळे नसतात, कारण त्यांच्या रक्तात त्यांचा इतिहास रुजलेला असतो. आपल्याकडे अजून महाराज रक्तात भिनले नाहीत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *