Headlines

मोहित कंबोज दलालच:श्रीकांत शिंदे उद्धव ठाकरेंकडे येऊन कितीवेळा रडलेत हे आम्हाला माहीत, कौतुक केलं म्हणजे भाजपमध्ये गेलो असं नाही- अंबादास दानवे




मोहित कंबोज हा दलाल आहे त्यांच्या विषयी मी परवा बोललो तर भाजपच्या लोकांचेच मला फोन आले की तुम्ही बोललात ते एकदम योग्य बोललात, असे म्हणत उबाठाचे नेते अंबादास दानवे त्यांच्यावर टीका केली आहे. तर श्रीकांत शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्याकडे येत कितीवेळा रडले हे आम्हाला माहिती आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंवर बोलूच नये आणि बोलले तरी ती गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असे म्हटले आहे. अंबादास दानवे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करायला काही हरकत नाही. पण त्यांचे कौतुक केले म्हणजे त्यांच्या पक्षात गेलो किंवा जायला पाहिजे असे काही नाही. राज्याचे मुख्यमंत्री चांगले काम करत असतील तर त्यांचे कौतुक करायला काही हरकत नाही. मी तर विरोधी पक्षातील सदस्य आहे. तरीही हरकत असायला काही कारण नाही. अमोल कोल्हे यांच्या पक्षाचे प्रमुख शरद पवार आहेत. त्यांच्या एकट्याच्या वाटण्याने पक्षात काही होणार नाही सर्वांनी मिळूल विचार केला तर काही होऊ शकते. संबंधित बातमी वाचा… ‘मला एखादी ऑफर आली तर मी भविष्यात विचार करेन’:अमोल कोल्हेंचे सूचक विधान, मुख्यमंत्र्यांचेही ‘इन्फ्रा मॅन’ म्हणत केले कौतुक महाराष्ट्रात सध्या राजकीय वातावरणात एकच खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील तब्बल 6 खासदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघात जाऊन सभा घेतल्या आणि जोरदार टीका केली. मात्र, यानंतर आणखी एक धक्का ठाकरेंना बसला, तो म्हणजे सचिन अहिर यांनी देखील शिंदे सेनेत प्रवेश केला. यानंतर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील सूचक विधान करून सर्वांच्या भाव्या उंचावल्या आहेत. “मला एखादी ऑफर आली तर मी भविष्यात विचार करेन,” असे विधान त्यांनी केले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी

इतकं गद्दळ राजकारण पाहिले नाही अंबादास दानवे म्हणाले की, राज ठाकरे जे बोलले आहेत ते काही चुकीचे बोलले नाही, ते मोठे नेते आहेत. आम्हीही गेले 35 वर्षे राजकारण करत आहोत जनतेत जातो, भाजपच्या लोकांना भेटतो परंतु काँग्रेस मजबूत असताना आम्ही विद्यार्थी चळवळीत काम केले आहे. लाठीमार खाल्ला, विरोध केला. पण गद्दळ राजकारण आता सुरू आहे हा काय प्रकार आहे. एका दिवशी एका पक्षात दुसऱ्या दिवशी दुसऱ्या पक्षात, तुम्ही आमदार-खासदार करता. तुम्ही निवडणुकीत उभे रहा आणि स्वत:चे लोकप्रतिनिधी निवडून आणा आणि स्वत:च्या पक्षात ठेवतात. 4 लोकं सोडून गेल्याचे दु:ख नाही अंबादास दानवे म्हणाले की, आपण जाणाऱ्यांना नाव ठेवतो पण घेणारी लोकं त्यांना घेतात कसे? त्यांना काय प्रलोभन देतात घेणाऱ्यांना सुद्धा लोकांनी बोलले पाहिजे. राजकारणात निर्माण झालेली परिस्थिती ही वेदनादायी आहे. पक्षातील 4 लोकं गेली म्हणून दु:ख व्हायचे काही कारण नाही. पक्ष ही सतत चालणारी प्रकिया आहे. यामुळे चळवळीत काम करणाऱ्या माणसांना वाटते की राजकारण सोडून द्यावे अन् आपला व्यवसाय केलेला बरा. हे रोज बाजारात उभे राहण्याला काय काय अर्थ आहे. अहिर अचानक तिकडे गेले अंबादास दानवे म्हणाले की, सचिन अहिर तिकडे जाण्यापूर्वी माझ्यासोबत जेवले आणि दुसऱ्या दिवशी तिकडे जात अचानक उपसभापतीपदाचा अर्ज दाखल केला. त्यांनाही हे माहिती होते का नाही काय माहीत, हा शॉक सर्वांना लागला. अनेकांना उपसभापद हवे होते ते लोकं सचिन अहिर गेल्याने नाराज होणं सहाजिक आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *