Headlines

मोहोळमधील अघोरी महाराजाच्या घरावर छापा:पोलिस ठाण्याबाहेर हायव्होल्टेज ड्रामा सुरु‎




मोहोळमधील तथाकथित भोंदू अघोरी महाराजांवर जादुटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करावी, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने मोहोळ पोलिसांत करण्यात आली होती. सदर मागणीची अत्यंत गांभीर्याने दखल घेत दि. २२ मे रोजी पोलिसांनी दोन पंचांना बोलावून थेट महाराजांच्या घराची झडती घेतली. दरम्यान, या झडतीमध्ये जादुटोणा प्रतिबंधक अशी कोणतीही वस्तू मिळून आली नसल्याची माहिती पोलीस निरीक्षक अजय केसरकर यांनी दिली. भोंदू अघोरी महाराजांवर कारवाईची तजवीज ठेवत, मोहोळ पोलिसांत सदर प्रकरणाची नोंद करून तूर्तास महाराजांना सोडण्यात आले आहे. पोलिसांनी अघोरी महाराजांची ‘साम, दाम, दंड, यंत्र, मंत्र, तंत्र’ अशा आशयाची व दोन मानवी कवटी व हाडांचे चित्र असलेली ३ डी प्रतिकृतीची नंबर प्लेट लावलेली एमएच १३ सीएस ४९०६ क्रमांकाची कार ताब्यात घेतली आहे. ^ संबंधित घराची झडती घेण्यात आली. या झडती दरम्यान जादुटोणा प्रतिबंधक असे काही एक वस्तू मिळून आलेली नाही. कार आणि मोबाईल ताब्यात घेऊन प्रकरणाची नोंद केली आहे. अजय केसरकर, पोलीस निरीक्षक, मोहोळ अघोरी महाराज पोलीस जाण्यापूर्वी घरावरून पडले होते. त्यामुळे त्यांचा पाय फॅक्चर झाला असून त्यावर प्लास्टर करण्यात आले होते. पोलिस ठाण्यात आणल्यावर वेदना होत असल्यामुळे ते रडू लागले. कारवाई करा, मात्र आमच्या हिंदू धर्माची विटंबना होईल, असे ते म्हणत होते. पोलिसांनी गाडीसह त्यांचा मोबाईल ताब्यात घेऊन त्यांना ठाण्यात आणले होते. दुसऱ्या मजल्यावर ५ फुटांचे हवन कुंड, राक्षस अन् भिंतीला चिटकवलेले डोळे अघोरी महाराज सागर शिवशकर राजेश्वर (वय ३८, रा. सोनार गल्ली, भाजी मंडई, सराफगल्ली, मोहोळ) याच्या घराची झडती घेतली असता तेथील दृश्य थरकाप उडवणारे होते. घराच्या दुसऱ्या मजल्यावर खूप भीती निर्माण होईल असे वातावरण आहे. खाली राहते घर आणि छोटे किचन असून वरच्या मजल्यावर मोठे हवन कुंड केलेले आहे. या हवन कुंडाची लांबी-रुंदी पाच फूट असून त्यात राख होती. सदर राख अंगाला लावण्यासाठी निर्माण करण्यात येत होती. विशेष म्हणजे, जाळ लावण्यासाठी बाहेरून इलेक्ट्रिक मोटर बसवली असून फॅन आहे, तसेच त्या इलेक्ट्रिक मोटरला पीव्हीसी पाइप बसवला आहे. जादुटोणा वस्तू आढळल्या नाहीत



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *