![]()
कन्नड-नागदला गौताळा अभयारण्य मार्गे जोडणाऱ्या राज्य महामार्ग क्रमांक ३९ वरील म्हैसघाटातील रस्ता अनेक दिवसांपासून धोकादायक झाला होता. अखेर म्हैसघाटातील दोन किलोमीटर रस्त्याच्या दुरुस्ती कामाला वन विभागाने मंजुरी दिली. आमदार संजना जाधव यांनी ही माहिती दिली. यामुळे मागील दोन वर्षांपासून प्रलंबित असलेली समस्या आता मार्गी लागणार आहे. कन्नड-नागद मार्ग म्हैसघाटातून गौताळा अभयारण्य क्षेत्रात जातो. दुरुस्ती, डांबरीकरणासाठी वन विभागाची परवानगी गरजेची होती. या रस्त्याचे डांबरीकरण १९८० साली झाले होते. त्यानंतर रस्त्याच्या रुंदीमध्ये कोणताही बदल झाला नाही. १९८० पूर्वीच्या मंजुरीच्या आधारे वन विभागाने दुरुस्ती, डांबरीकरणाला हिरवा कंदील दिला. प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. आमदार जाधव यांनी सातत्याने पाठपुरावा केला. संबंधित विभागांशी समन्वय साधला. प्रश्न मार्गी लागला. सोलापूर-धुळे महामार्गावरील कन्नड-चाळीसगाव औट्रम घाट अवजड ^कन्नड-नागद मार्गावरील म्हैसघाट रस्त्याच्या कामासाठी आम्ही सातत्याने निधीची मागणी करत आहोत. मात्र, हा रस्ता वन विभागाच्या हद्दीत येत असल्याने परवानगी मिळवणे अत्यंत कठीण ठरत आहे. म्हैसघाटातील खराब झालेल्या रस्त्याची तात्पुरती डागडुजी करण्यासाठीही वन विभागाकडून परवानगी मिळत नाही. परवानगी मिळाल्यास आम्ही तत्काळ, अगदी दुसऱ्याच दिवशी रस्त्याचे काम हाती घेऊ. दरम्यान, म्हैसघाटातील दोन किलोमीटर रस्त्याच्या दुरुस्तीचा प्रस्ताव दीर्घकाळ प्रलंबित होता. त्यास आता मंजुरी मिळाल्याने प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. – रवींद्र जारवाल, सहायक कार्यकारी अभियंता, सा. बां. उपविभाग, पूर्व कन्नड वाहनांसाठी बंद आहे. अनेक वाहनचालक पर्यायी, जवळचा मार्ग म्हणून कन्नड-नागद रस्त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहेत. वाहतुकीचा ताण वाढल्याने रस्त्याची अवस्था दयनीय झाली. घाटात लहान-मोठे अपघात झाले. तातडीने दुरुस्ती व्हावी म्हणून सामाजिक कार्यकर्ते तथा कलाकार तोताराम पवार, सागर पाटील, गंगाधर पाटील, ग्रामस्थांनी सातत्याने आंदोलने केली होती. या निर्णयामुळे वाहतूक व्यवस्था सुधारण्यास मदत होणार आहे. वाहनचालक, प्रवासी, नागरिकांना दिलासा मिळणार आहे. रस्त्याच्या उर्वरित कामासाठी पाठपुरावा
Source link
म्हैसघाटातील 2 किलोमीटरच्या रस्त्याला वन विभागाकडून मंजुरी:कन्नड-नागदची वाहतूक व्यवस्था सुधारण्यास होईल मदत