Headlines

रक्षा खडसेंनी भाजप सोडून लोकसभेची निवडणूक लढवून दाखवावी:त्यांच्याकडून जिल्हा बँकेत मतचोरी सुरू, निवडणूक बिनविरोध न झाल्याने त्यांची चिडचिड- चंद्रकांत पाटील




खडसे यांच्या नावाने जर कोणाचा फायदा झाला असता, तर कशाला 24 हजार मतांनी पराभव झाला असता? रक्षा खडसे यांनी भाजप सोडून लोकसभेची निवडणूक लढवून दाखवावी. रक्षा खडसे यांनी कोणाचे काम केले? त्या थेट निवडणूक लढलेल्या नाहीत, त्यांना पदावर आणून बसवले आहे, अशी टीका शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. आमदार चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत रक्षा खडसे यांच्याकडून मतचोरी होत आहे. केंद्रात मंत्रिपद असणारे लोक स्वतःलाच 3 मते टाकतात, ही मतचोरी आहे. याकडे देशाचे लक्ष वेधले गेले पाहिजे. रक्षा खडसे यांनी ‘मधुकर’सारखा साखर कारखाना बंद पाडला, हेच त्यांचे कर्तृत्व आहे. खडसे यांनी मंत्रिपदाचा गैरवापर करत मुक्ताईनगरमधील किती जागा संस्थांच्या नावाखाली स्वतःच्या नावावर केल्या आहेत, पण यावर आम्ही बोलणार नाही. ..म्हणून रक्षा खडसेंची चिडचीड चंद्रकांत पाटील म्हणाले की, जळगाव जिल्हा बँकेचे जागावाटप हे भाजपच्या तिन्ही नेत्यांनी ठरवल्याप्रमाणेच झाले आहे. मुक्ताईनगरची जागा भाजपच्या पदरी आली आणि भाजप ती लढत आहे. माझ्या उमेदवाराला महायुतीची उमेदवारी मिळाली नाही. जिल्ह्यातील इतर मंत्र्यांची निवडणूक बिनविरोध झाली आणि रक्षा खडसे यांना निवडणुकीला सामोरे जावे लागत असल्याने त्यांची चिडचिड होत असावी; म्हणून त्या माझ्या नावाने गरळ ओकत फिरत आहेत. मी काही खडसे यांच्या विरोधात नाही, तर एका विचाराच्या विरोधात आहे. मतदारांवर विश्वास नसल्यानेच त्यांना बाहेरगावी ठेवले चंद्रकांत पाटील म्हणाले की, मुक्ताईनगरमध्ये सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध झाली नाही, याला केंद्रीय मंत्र्यांचे वागणे आणि बोलणे कारणीभूत आहे. त्यांनी मतदारांना अनेक दिवसांपासून बाहेरगावी ठेवले आहे. आम्ही त्यांच्याविरोधात काय ताकद लावणार? मी सामान्य माणूस आहे. त्यांचा मतदारांवर विश्वास नसल्यानेच त्या त्यांना बाहेर फिरण्यासाठी घेऊन गेल्या आहेत, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी रक्षा खडसे यांना लगावला. एकनाथ खडसे ज्या पक्षात तो पक्षच मुक्ताईनगरात नाही चंद्रकांत पाटील म्हणाले की, एकनाथ खडसे यांनी ज्यावेळी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला, त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी उत्तर महाराष्ट्रात वाढवणार असल्याचे म्हटले होते; पण आज अशी परिस्थिती आहे की, मुक्ताईनगरमध्येच राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व राहिलेले नाही. रक्षा खडसे आणि राष्ट्रवादी काही वेगळे नाही. हेही वाचा… सत्तेत येण्यासाठी भारत-पाकिस्तान युद्धाचा अजेंडा: शरद पवार दाऊद इब्राहिमचे मित्र; मला अनेकांचा इतिहास माहिती- प्रकाश आंबेडकर देशातील राजकीय पक्ष विकले गेले आहेत. शरद पवार हे दाऊद इब्राहिमचे मित्र आहेत. मी अनेकांचा इतिहास सांगू शकतो; हा सर्व इतिहास आरएसएसच्या लोकांनी स्वतःकडे ठेवला आहे, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. ते पुढे म्हणाले की, इथल्या राजकीय पक्षांच्या नेत्यांना एकप्रकारे गुलाम करण्यात आले आहे. त्यामुळे देशाचे संविधानच नाही, तर स्वातंत्र्यसुद्धा धोक्यात आले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *