![]()
अभिनेता रितेश देशमुखचा बहुप्रतिक्षित राजा शिवाजी हा चित्रपट 1 मे रोजी देशभरात प्रदर्शित झाला असून या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 11.70 कोटींचे बंपर ओपनिंग कलेक्शन केले आहे. प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता दिसून येत आहे. चित्रपट बघून आलेले अनेक जण चित्रपटातील वेगवेगळ्या दृश्यांच्या क्लिप्स रेकॉर्ड करून त्या सोशल मीडियावर अपलोड करत आहेत. यामुळे सोशल मीडियावरही या चित्रपटाची क्रेझ दिसून येत आहे. मात्र रितेश देशमुखने प्रेक्षकांना असे न करण्याची विनंती केली आहे. प्रेक्षकांनी कृपया अशा क्लिप्स सोशल मीडियावर शेअर करू नका अशी विनंती त्याने केली आहे. तुम्ही हवे तर चित्रपटाचे फोटो सोशल मीडियावरून शेअर करा, मात्र अशा क्लिप्स शेअर करू नका अशी विनंती त्याने केली आहे. असे केल्याने जे प्रथमच चित्रपट बघायला जाणार आहेत, त्यांच्यासाठी असलेले सरप्राइज यामुळे राहणार नाही. म्हणून अशा क्लिप कृपया शेअर करू नका असे आवाहन रितेशने व्हिडिओच्या माध्यमातून केले आहे. ‘राजा शिवाजी’चा बॉक्स ऑफिसवर धमाका:पहिल्याच दिवशी 11.70 कोटींची कमाई; ‘सैराट’चा रेकॉर्ड मोडला ट्रेड वेबसाइट Sacnilk च्या वृत्तानुसार, राजा शिवाजी चित्रपटाला मराठी प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने मराठीत तब्बल 8.75 कोटी रुपयांचा गल्ला केला. तर हिंदीत 2.95 कोटींची कमाई केली. आज व उद्या विकेंड आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या कमाईत आणखी भर पडण्याची शक्यता आहे. या चित्रपटाच्या अभूतपूर्व एन्ट्रीचे मुख्य श्रेय त्याच्या मराठी आवृत्तीला जाते. महाराष्ट्रातील मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रीन अशा दोन्ही ठिकाणी या आवृत्तीने प्रेक्षकांची जोरदार उपस्थिती नोंदवली आहे. दुसरीकडे, हिंदी आवृत्तीच्या आगाऊ तिकीट विक्रीनेही गती पकडली असून, चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच पहिल्या दिवसाची एकूण कमाई (gross) १ कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे. वाचा पूर्ण बातमी…
Source link
'राजा शिवाजी' प्रदर्शित; रितेश देशमुखने केली एक विनंती:'कृपया चित्रपट पाहताना व्हिडिओ काढून सोशल मीडियावर अपलोड करू नका'