![]()
राज्यातील सन २०२६-२७ च्या आगामी ऊस गाळप हंगामाचे धोरण निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे मंत्री समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत यंदाचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू करण्यास अधिकृत मान्यता देण्यात आली. तसेच, शेतकरी आणि साखर उद्योगाच्या हिताचा समतोल साधत साखर कारखान्यांना दिलासा देणारे अनेक मोठे निर्णय या बैठकीत घेण्यात आले. दिग्गज मंत्र्यांची उपस्थिती या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत ऊस उपलब्धता, गाळपाचे नियोजन, एफआरपी (FRP) आणि कारखान्यांसमोरील तांत्रिक अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. कारखान्यांना आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी बैठकीत विविध योजनांचे सादरीकरण केले. ज्या साखर कारखान्यांचे सहवीज निर्मिती प्रकल्पांशी संबंधित वीज खरेदी करार संपुष्टात आले आहेत, त्यांना २०२३-२४ च्या हंगामाप्रमाणेच प्रति युनिट १.५० रुपये सबसिडी देण्याचा मोठा निर्णय सरकारने घेतला आहे. याशिवाय, थकीत देणी देण्यासाठी सॉफ्ट लोनवर व्याज अनुदान सुरू करणे, साखर पॅकिंगसाठी ज्युट बॅगची सक्ती शिथिल करणे आणि सीबीजी (CBG) निर्मिती प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सुधारित ऊस वाण, ठिबक सिंचन आणि खतांच्या संतुलित वापरासाठी ‘विशेष ऊस विकास योजना’ लागू केली जाणार आहे. केंद्राकडे करणार ‘या’ प्रमुख मागण्या साखर उद्योगाला उभारी देण्यासाठी राज्य सरकार केंद्र सरकारकडे काही महत्त्वाच्या शिफारसी करणार आहे. यामध्ये साखरेच्या किमान विक्री किंमतीत (MSP) वाढ करणे, इथेनॉलच्या दरात वाढ करणे आणि इथेनॉल प्रकल्पांचे प्रलंबित व्याज अनुदान तातडीने उपलब्ध करून देणे, या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे. या शिफारसी मान्य झाल्यास राज्यातील साखर उद्योगाला मोठा आर्थिक दिलासा मिळण्याची शक्यता आहे. हेही वाचा.. जरांगेंच्या उपोषणाचा 12 वा दिवस: मराठ्यांचे वाटोळे करणारे तुम्हाला चालणार का? मराठ्यांच्या अंगावर मराठे सोडले तर शिंदे संपून जातील- जरांगे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज 12 वा दिवस आहे. आंतरवाली सराटीमध्ये 12 तारखेला राज्यव्यापी बैठक होणार आहे. या बैठकीत मुंबईला जाण्याची तारीख स्पष्ट केली जाणार आहे. काल मराठा आंदोलकांनी आक्रमक होत आंदोलन केले आहेत. मनोज जरांगे पाटील मुंबईत जाण्यापूर्वी सरकार काही तोडगा काढणार का? हे पाहणं महत्त्वाचे आहे. सविस्तर वाचा
Source link
राज्यात 15 ऑक्टोबरपासून गाळप हंगामाचा श्रीगणेशा:साखरेचे दर वाढवण्यासाठी राज्य सरकार केंद्राकडे करणार शिफारस