![]()
अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीचे पडसाद आता मोहोळच्या शिवारापर्यंत उमटू लागले आहेत. इंधन दरवाढीपाठोपाठ रासायनिक खतांचा तुटवडा आणि गगनला भिडलेल्या किमतींमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या महागाईने जगाच्या पोशिंद्याला जेर
.
जागतिक युद्धाच्या सावटाने कच्च्या मालाचा पुरवठा खंडित झाला आहे. युरिया, १०:२६ आणि १८:४६ सारख्या प्रमुख खतांच्या किमतीत पोत्यामागे ४०० ते ५०० रुपयांची वाढ झाली आहे. त्यातच खत विक्रेत्यांकडून केली जाणारी ‘लिंकिंग’ची (बळजबरीने दुसरे खत देणे) सक्ती शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहे. या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी शेतकरी आता शेणखतालाच ‘संजीवनी’ मानत आहे.
रासायनिक खतांमुळे जमिनी पडीक होऊ लागल्या आहेत. उत्पादन क्षमता घटल्याने मोहोळ तालुक्यातील शेतकरी आता शेणखताच्या शोधात आहेत. मात्र, पशुधनाची संख्या घटल्याने शेणखत उपलब्ध होणे कठीण झाले आहे. मागील वर्षी ४ हजारांच्या आसपास मिळणारी शेणखताची ट्रॉली आता ५ ते ७ हजारांच्या दरम्यान विकली जात आहे. ^खतांनी जमिनीचा पोत बिघडला आहे. त्यामुळे आम्ही पुन्हा शेणखताकडे वळलो आहोत. मागणी वाढल्याने आता शेणखताला पूर्वीचे वैभव प्राप्त होत आहे. यामुळे पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या पशुधनाच्या चाऱ्याचा खर्च निघण्यास मोठी मदत होत आहे. महेश धावणे, शेतकरी. ^ खतांच्या अतिवापराने जमिनीची सुपिकता कमी होऊन ती बंजर होऊ लागली आहे. शेणखतात जमिनीला व पिकांना पोषक सर्व घटक असल्याने ते जमिनीसाठी संजीवनीचे काम करते. पशुधन सांभाळणे कसरत असले, पशुपालनावर भर दिल्यास शेणखताची किंमत स्थिर ठेवण्यास मदत होईल. हर्षद निगडे, कृषी अधिकारी केवळ शेणखत विकत घेऊन चालत नाही, तर त्याचा व्यवस्थापन खर्च मोठा आहे. खरेदी किंमत ५,००० ते ७,००० रुपये, ट्रॉली भरणे १,००० रुपये. वाहतूक (इंधन) २,००० ते ३,००० रुपये, शेतात पसरवणे ७०० रुपये. एकूण हिशोब पाहता, एक ट्रॉली शेणखत शेतात पोहोचेपर्यंत शेतकऱ्याला ८ ते ९ हजार रुपये मोजावे लागत आहेत.
१ ट्रॉली खत ९ हजारांना
जमिनीचा पोत बिघडला