Headlines

नसरापूर अत्याचार प्रकरण; नराधमास फासावर लटकवा:राहुरीतील ब्राम्हण संघटना व नागरिकांचे प्रशासनाला निवेदन‎




पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे चार वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या नराधमाला त्वरित फाशी द्यावी, या मागणीसाठी राहुरीतील ब्राह्मण संघटना आणि नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. या घटनेचा तीव्र निषेध करत, दोषीला लवकरात लवकर फासावर लटकवण्यासाठी हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा, असे निवेदन प्रशासनाला देण्यात आले. राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे आणि तहसीलदार डॉ. अमित पवार यांना देण्यात आलेल्या निवेदनात नागरिकांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. या खटल्यासाठी कायदेतज्ज्ञ विशेष सरकारी वकीलाची नियुक्ती करावी आणि कोणत्याही वकिलाने नराधमाचे वकीलपत्र घेऊ नये, असे आवाहनही करण्यात आले आहे. शासनाने या प्रकरणात दिरंगाई न करता त्वरित निकाल लावावा, अन्यथा त्या नराधमाला जनतेच्या हवाली करावे,” अशा शब्दांत आंदोलकांनी आपला संताप व्यक्त केला. निवेदनावर शिरीष गुणे, अनिल देशपांडे, संजय कुलकर्णी, सुनील जोशी, अनिरुद्ध कुलकर्णी, पुष्कर कुलकर्णी, कृष्णा कुलकर्णी, दिलीप कुलकर्णी, सुनील दायमा, नितीन सातभाई, राजेंद्र देशपांडे, सुरेश क्षिरसागर, धनंजय पुरोहित, डॉ. श्रीकांत कुलकर्णी, ऋषिकेश कुलकर्णी, विकास देशपांडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. या घटनेमुळे संपूर्ण राहुरी शहरात हळहळ व्यक्त होत असून दोषीला कठोर शासन मिळावे, अशी एकच मागणी जोर धरत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *