![]()
मिरजगाव येथे मुख्य रस्त्यावर अशी वाहने उभी असतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी रस्त्याच्या दुतर्फा उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे ज्येष्ठ नागरिक रस्त्यावर पडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे सिमेंट रस्त्यावर वाहने उभी केल्यास तत्काळ दंड आकारला जावा. पोलीस आणि ग्रामपंचायत प्रशासनाने निर्ढावलेली भूमिका सोडून रस्त्यावर उतरणे आवश्यक आहे. रस्त्यावरील अतिरिक्त अडथळे दूर करून वाहतूक सुरळीत करण्याची गरज. शालेय वेळेत वाहतूक पोलीस किंवा वार्डनची नेमणूक करून विद्यार्थ्यांचा मार्ग सुकर करावा. केवळ सूचना न देता वाहने जप्त करण्यासारखी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. शहराचा विकास होत असताना मुख्य रस्ते हे केवळ वाहनांच्या सोयीसाठी नसून ते पादचारी आणि नागरिकांच्या सुरक्षित वावरासाठीही आहेत. सार्वजनिक रस्त्यांचा वैयक्तिक पार्किंगसाठी वापर करणे हा कायद्याने गुन्हा असून, यामुळे सर्वसामान्यांच्या फिरण्याच्या स्वातंत्र्यावर गदा येत आहे. प्रशासनाने निव्वळ बघ्याची भूमिका न घेता ‘राईट टू वॉक’ जपण्यासाठी रस्त्यांचे ऑडिट करून कायमस्वरूपी नो-पार्किंग झोन जाहीर करणे ही काळाची गरज आहे.
Source link
मिरजगावात बेशिस्त पार्किंगचा विळखा:पादचाऱ्यांचा जीव टांगणीला, नागरी हक्क, सुरक्षिततेचा प्रश्न; कायमस्वरूपी नो-पार्किंग झोन जाहीर करण्याची गरज