![]()
दिवाळीच्या मंगल पर्वाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी आणि संस्कारांचा अनोखा संगम घडवून आणणारा उपक्रम विद्या भारती विदर्भ संलग्नित श्री संताजी इंग्लिश प्रायमरी, मिडल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये पार पडला. या उपक्रमांतर्गत रोटरी क्लब ऑफ अकोला यांच्या वतीने
.
रोटरी क्लब ऑफ अकोलाचे अध्यक्ष ॲड. गिरीश दाभेलिया यांच्या मार्गदर्शनात तसेच रोटरी क्लबचे सदस्य ॲड. राधेश्याम मोदी, नेहरू तारापूरवाला आणि अशोक पांड्या यांच्या पुढाकारातून या उपक्रमासाठी संताजी कॉलेजची निवड करण्यात आली होती. एका बाजूला नवीन पोशाखातून सणाचा आनंद द्विगुणित करण्याचे काम रोटरी क्लबने केले, तर दुसऱ्या बाजूला श्रीमद्भगवद्गीतेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनात संस्कार, सद्विचार, कर्तव्यनिष्ठा आणि नैतिक मूल्यांची रुजवण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या दुहेरी उपक्रमामुळे विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर समाधान व आनंद पाहायला मिळाला. या स्तुत्य उपक्रमाबद्दल शाळेचे संस्थापक अध्यक्ष मंगेश वानखडे यांनी रोटरी क्लब ऑफ अकोला, श्री परमहंस स्वामी अडघडानंद आश्रम ट्रस्ट व सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार मानले. दिवाळी म्हणजे केवळ रोषणाईचा उत्सव नसून उपेक्षित व गरजू घटकांच्या जीवनात आनंदाचा प्रकाश पेरण्याचा सण आहे. विद्यार्थिनींना नवीन कपडे देऊन त्यांच्या सणाचा आनंद द्विगुणित करण्यात आला, तर श्रीमद्भगवद्गीतेच्या माध्यमातून जीवनाला योग्य दिशा देणारे तत्त्वज्ञान पोहोचवण्यात आले. सामाजिक संस्थांनी शाळांशी जोडलेली ही नाळ संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी अत्यंत मोलाची ठरत असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.
संस्कारक्षम पिढी घडवण्याचा संकल्प; दिवाळी आनंद देणारा सण