![]()
मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते आणि मातोश्री शेतरस्ता योजनेंतर्गत अकोला पूर्व मतदारसंघातील शेतरस्त्यांच्या कामांचा शुभारंभ महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते दूरस्थ प्रणालीद्वारे बुधवारी करण्यात आला. दुष्काळ निवारणार्थ ग्रामपंचायत, अर्थात गावनिहाय कृती आराखडा तयार करून यात प्रभावी उपाययोजना नमूद करण्यात याव्यात, असा आदेश ना. बावनकुळे यांनी महसूल व जिल्हा परिषद प्रशासनाला दिला. तसेच ५ वर्षांत सर्वच गावांमध्ये शेतरस्ते होतील, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली. आराखड्यांच्या अंमलबावणीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही ते म्हणाले. दुष्काळाच्या या परिस्थितीत पाणी बचत, चारा टंचाईवर मात करण्यासाठी नदी-नाल्यांचे खोलीकरण, गाळ काढणे, मुरघास व ठोब्यांच्या वितरणातून चारा लागवड, जुने बंधारे पुनर्जीवित करणे, आदी कामे हाती घेण्यात आली आहेत, असे मंत्री बावनकुळे म्हणाले. नाम फाउंडेशनच्या माध्यमातून कामे होणार आहेत. कार्यक्रमाला आमदार रणधीर सावरकर, महापौर शारदा खेडकर, जिल्हाधिकारी वर्षा मीना, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनय नावंदर, मनपा आयुक्त सुनील लहाने, पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, नाम फाउंडेशनचे कार्यकारी अध्यक्ष गणेश थोरात व जिल्हा समन्वयक राजाभाऊ शेळके, एसडीओ शरद जावळे होते. आभार तहसीलदार कुणाल झाल्टे यांनी मानले. दुर्लक्ष नको, आमदार सावरकर मृद संधारणेकडे दुर्लक्ष नको, असे आमदार रणधीर सावरकर म्हणाले. प्रत्येक गावात तीन नाले तयार करणे गरजेचे आहे. अकोला पूर्व मतदारसंघात सर्वच शेतरस्त्यांसाठी ५२ कोटींची आवश्यकता आहे. मात्र अकोला पंचायत समितीअंतर्गत ४ गावांसाठी २ ते ५ कोटींपर्यंत रोजगार हमी योजनेतून रस्त्यांची कामे मंजूर झाली. हे करताना समतोल राखणे गरजेचे होते. या गावाच्या शेतकऱ्यांना लाभ २०.३० कि. मी. लांबीच्या पाणंद रस्त्यांना २ कोटी २९ लाख निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. {बोंदरखेड सिसा येथे रेल्वे लाईन, लांबी १.८० कि.मी. अंदाजित निधी-१८.०१ लाख {चांदूर ते सातमैल रस्ता, लांबी २.९५ कि.मी., निधी- २७.९६ लाख {शिर्ला वाठ ते माझोड, लांबी ३.८५ कि.मी., निधी-५६.९४ लाख {जैनपूर रोड, गट क्र. ४ ते २१४, लांबी -१.४० कि.मी., निधी-२०.३९ लाख { एकलारा ते अपोती खुर्द, लांबी ५.०० कि.मी., निधी-३३.०९ लाख {कळंबेश्वर ते खिरपुरी रस्ता, लांबी – २.३० कि.मी., अंदाजित निधी- ३५.१६ लाख {सांगवा ते पालसो बु. रस्ता, लांबी- ३.०० कि.मी., निधी- ३७.४६ लाख. या स्रोतांमधून मिळेल निधी आर्थिक तरतूद : दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी गावनिहाय दुष्काळ निवारणार्थ कृती आराखडे तयार होणार आहेत. आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा नियोजन समिती, राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांमधून निधी उपलब्ध होणार आहे. निधी कमी पडू नये. यासाठी जनसुविधांसह अन्य रस्त्यांची कामे, बांधकामे करण्यात येणार नाहीत. अशी होणार अंमलबजावणी:- नोंद असलेल्या व नसलेल्या रस्त्यांवर शेतरस्ते होणार आहेत. ग्रामीण भागातील पाणंद रस्ते निर्मितीसाठी रस्त्यांचे सीमांकन करणे, अतिक्रमण हटवून अचूक मोजणी करणे, या कामांसह रस्त्यांच्या दुतर्फा झाडे लावणे, अतिक्रमण काढणे, आदी कामे प्राधान्याने करण्यात येणार आहेत.
Source link
सर्व गावांत होणार शेतरस्ते; गावनिहाय आराखडे तयार करा- मंत्री बावनकुळे:20 कि. मी लांबीच्या पाणंद रस्त्यांचा शुभारंभ; 2 कोटी 29 लाख रुपयांचा निधी