![]()
मनमाड लग्नसराईचा हंगाम सुरू होताच मनमाड शहरातील फुलबाजारपेठेला चांगलीच झळाळी प्राप्त झाली आहे. विवाह समारंभ, साखरपुडा, हळद, देवकार्य तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असून, त्याचा थेट परिणाम फुलांच्या दरावर झाला आ
.
फुलांचे सध्याचे दर जरबेरा – ३५ रुपये नग गुलाब – ६०० रुपये क्रेट साधा गुलाब – ७५० रुपये शेकडा झेंडू – ५५० रुपये क्रेट सब्जा – ५५ ते ६० रुपये किलो रंगीबेरंगी फुले – २० ते ४५ रुपये नग मोगरा – ८०० रुपये किलो गुलछडी – ३०० ते ४०० रुपये किलो पिवळा गोंडा व झेंडू – १०० रुपये किलो शेवंती – २०० रुपये किलो
लग्नसमारंभ, वाढते तापमान, यामुळे वाढले फुलांचे दर ^ वाढते तापमान, तीव्र ऊन आणि लग्नसमारंभांमुळे फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे दरात दुपटीने वाढ झाली आहे. लग्नतिथी कमी झाल्यानंतर दर घटतील. – बाळासाहेब गोंधळे, घाऊक फुल विक्रेते, मनमाड
लग्नांमुळे मोगऱ्याच्या गजऱ्यांना विशेष मागणी लग्न समारंभांमध्ये सध्या मोगऱ्याच्या गजऱ्यांना महिलांकडून मोठी मागणी आहे. प्रतिष्ठेचा भाग बनलेल्या या सुवासिक गजऱ्यांची घाऊक विक्री मोठ्या प्रमाणात होत असून, त्यांचे दर सध्या १५०० ते १८०० रुपये शेकडा इतके आहेत.